
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोना रूग्णांची रुग्णांची वाढ थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावेत असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केला.
कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग, लसीकरण व वैद्यकीय बील यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार ऋतुराज पाटील, महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
कोल्हापूर शहर सुरू होत आहे. सरसकट दुकाने उघडण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे, यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता प्रशासन व नागरिकांनी घेतली पाहिजे. जे कोरोना रुग्ण घरी अलगीकरण आहेत, आशा रुग्णांच्यावर विशेष लक्ष ठेवले पाहिजे. हे रुग्ण बऱ्याच ठिकाणी फिरताना दिसत असल्याने शहरातील रुग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने घरी अलगीकरण असलेल्या रुग्णांच्या वर विशेष लक्ष ठेवावे.
प्रशासनाने निर्बंध कडक करावेत, होम क्वॉरंटाइन बंद करावे, बाधितांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर करा, कंटेनेमेंट झोन्समध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे, याची दक्षता घ्या, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा ; मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणा अशा सूचना आमदार जाधव यांनी केले.
लसीकरण केंद्रावर गोंधळ होऊ नये यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे. लसीकरणामध्ये प्राधान्याने दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या नाही पाहिजेत. ज्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे, अशा नागरिकांना महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने फोन करावेत. ज्यांना फोन झालेत, त्यांना वेळेचे स्लॉट द्या व त्याच वेळेत त्यांनी केंद्रावर येऊन लस घ्यावी. ज्यांना फोन झालेला नाही त्यांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करी नये व गोंधळ होणार नाही याची दक्षता कोल्हापूरकरांनी घ्यावी असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून नागरिक आर्थिक संकटात आहेत. कोरोनाचे उपचार घेताना नागरिक अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी सेवा म्हणून वैद्यकीय क्षेत्राकडे पाहिले पाहिजे. तसेच महानगरपालीकेने नेमलेल्या ऑडीटरनी वैद्यकीय बीलांचे तंतोतंत ऑडीट करून, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा द्यावा, अशी सूचना आमदार जाधव यांनी केली.उपायुक्त रविकांत आडसुळ, उपआयुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, डॉ. अमोलकुमार माने आदी उपस्थित होते.कोरोना लसीकरण केंद्रावरील गोंधळ टाळण्यासाठी महानगरपालिकेने सोशल मिडीया, रेडीओ व वृत्तपत्रातून नागरिकांना आवाहन करावे अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.
Leave a Reply