
कोल्हापूर: आज कोल्हापूर येथे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, महाद्वार व्यापारी संघ व अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत भेट घेतली.शंभर दिवसांच्या प्रदीर्घ लॉकडाऊन मध्ये व्यापार्यांचे झालेले प्रचंड नुकसान, व्यापाऱ्यांच्या झालेल्या अडचणी विशद केल्या. जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी व्यापाऱ्यांची भूमिका सकारात्मकतेने मांडली..आरोग्यमंत्र्यांनी सोमवारपासून व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली जाईल असे स्पष्ट आश्वासन ललित गांधी यांना दिले.. सर्व व्यापाऱ्यांनी संघटीत राहून या लढ्याला बळ दिल्याबद्दल गांधी यांनी सर्व व्यापाऱ्यांना धन्यवाद दिले.तसेच या लढ्यात सहकार्य केलेल्या सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, व राज्य सरकार यांनाही धन्यवाद दिले.
Leave a Reply