पाच बालकांच्या “काँक्लीअर इम्प्लांट” शस्त्रक्रियांकरिता संवाद व आस्थाच्यावतीने मदतीसाठीआवाहन

 

कोल्हापूर : भाषा ही ऐकूनच शिकता येते व बोलण्यास मदत होते. कर्णबधीरतेमुळे ऐकू येत नाही. त्यामुळे भाषा विकास होत नाही. या दोषावर आधुनिक उपचार पद्धती म्हणजे कॉक्लीअर इम्प्लांट ( cochlear implant ) शस्त्रक्रिया गरजेचीच असते. कॉक्लीअर इम्प्लांट ही कानाची अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे. या अगोदर मुंबई- पुण्यात होणारी ही शस्त्रक्रिया आता लाँकडाऊनमुळे कोल्हापूरात करण्यात संवादने यश मिळवले आहे.सध्या यामध्ये पाच बालकावर त्वरित शस्त्रक्रिया होण्यासाठी लागत असलेल्या ३० टक्के रक्कम पुर्तीसाठी समाजातील दानशुरासह औद्योगिक विश्वाने मदत करावी, असे आवाहन संवाद आणि आस्था चे समन्वयक या दोन्ही संस्थाच्या वतीने करण्यात येत आहे.
या शस्त्रक्रियेमध्ये कानाच्या आतमध्ये यंत्र बसवले जाते.हे यंत्र कानाबाहेरील श्रवणयंत्रासारख्या दिसणाऱ्या यंत्राला जोडले जाते. यामुळे मुलास उत्तमरीत्या ऐकू येते. कॉक्लीअर इम्प्लांटमुळे बाळाला ऐकण्यास मदत होते. स्पीच थेरपीच्या सहाय्याने बाळ बोलू लागते आणि सामान्य माणसासारखे समाजात संवाद करू शकते.त्याच्या शिक्षणास अडथळा येत नाही. पहिल्या टप्प्यात 2 ते 5 वर्षांच्या बालकांवर शस्त्रक्रिया होणार आहे असे शिल्पा हुजूरबाजार,राजीव हुजूरबाजार यांनी सांगितले.संवाद क्लिनीक गेली 30 वर्षे कर्णबधीरता या क्षेत्रात कार्यरत आहे . यामध्ये जन्मजात बालकापासून मोठ्या माणसांपर्यंत ” ऐकणे व बोलणे ” या संबंधी सर्व मार्गदर्शन अत्याधुनिक सुविधा- टेक्नॉलॉजी उपचार उपलब्ध आहेत . संवाद क्लिनिक गेली 15 वर्षे कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेपश्चात स्पीच थेरपी याबाबत काम करत आहे .ही शस्त्रक्रिया आधी मुंबई व पुणे या मोठ्या शहरामध्येच होत होती.पण आता संवाद क्लिनिकच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया कोल्हापूर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहेत. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता कोल्हापूरमध्ये उपलब्ध होईल . गेल्यावर्षी ५ मुलांचे निदान होऊन ती शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. ही शस्त्रक्रिया खर्चिक असून एका मुलाच्या पूर्ण उपचाराचा खर्च आठ लाख इतका आहे. यातील ८० टक्के रक्कम शासकीय योजनासह इतर संस्थाच्या मदतीने उपलब्ध झाली असून या मुलांच्या पालकांना अजून २ लाख रु.मदतीची आवश्यकता आहे. आस्था चॅरीटेबल इन्स्टिट्यूट व संवाद रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही रक्कम उभी करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती – सामाजिक संस्थानी तसेच औद्योगिक संस्थानी आपल्या सामाजिक कृतज्ञता निधीतून मदत करावी, असे जाहीर आहवान करण्यात येत आहे.सदर मदतीसाठी ८० – जी ही सुविधा देगणीदाराना मिळणार आहे. तरी इच्छुकानी आस्था चँरिटेबल ईन्टीट्युट,HDFC 0004800 बँक खाते नंबर 50200054722088 येथे रक्कम जमा करावी अथवा संवाद वाचा श्रवणदोष ऊपचार केंद्र, भेंडे गल्ली, शिवाजी पुतळ्या जवळ,कोल्हापूर येथे संपर्क साधावा अथवा 0231- 2541071 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.यावेळी स्वाती गोखले, यश हुजूरबाजार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!