
कोल्हापूर: अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने कोल्हापुरातील शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. ते भरून निघण्यासारखे नाही. मात्र त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने १५ हजार रुपयांची मदत करावी आणि ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, अशा कुटुंबांना ५० हजार रुपये द्यावेत. तर व्यापारी आणि दुकानदारांना नुकसानीच्या २५ टक्के रक्कम भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केली.
महापुरामुळे सर्वसामान्य माणसांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरलेल्या बहुतांश नागरिकांनी नातेवाईक, मित्रमंडळींकडे आश्रय घेतलाय. पण महापुरामुळे त्यांचे जे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे, ते भरून निघण्यासारखे नाही. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला तातडीने १५ हजार रूपये दयावेत आणि ज्या घरांची पडझड झाली आहे, त्यांना ५० हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केली.
Leave a Reply