
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे महापुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून राष्ट्रीय राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, सध्या पावस उघडला असल्याकारणाने राष्ट्रीय राज्यमार्ग सुरु झालेनंतर या वाहनांकडून टोल प्लाझावर तीन ते चार दिवस टोल आकारू नये अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय दळण-वळण मंत्री नाम. नितीन गडकरी व राज्याचे सा.बां. मंत्री नाम. एकनाथ शिंदे यांचेकडे तातडीच्या निवेदनाव्दारे केली आहे.
खासदार मंडलिक यांनी केलेल्या मागणीमध्ये कोल्हापूर जिल्हयात महापुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून शहराच्या दोन्ही बाजूस राष्टीय राज्य महामार्गावर वाहनांच्या दोन-तीन दिवसांपासून लांबच-लांब रांगा लागलेल्या आहेत. यामध्ये नाशवंत माल, औषधे, धान्य, भाजी-पाला आदि अत्यावश्यक सेवेतील माल असून या मालाची कोल्हापूर जिल्ह्यास तातडीने आवश्यकता आहे. पावसाचे पाणी ओसरल्यावर राष्ट्रीय राज्यमहामार्गावरुन वाहतुक सुरु झालेनंतर या वाहनांच्याकडून टोल वसूल केल्यास ट्रॅफीक जाम होवून गोंधळ उडण्याची भिती आहे. याकरीता कोल्हापूर जिल्ह्यातील पुरबाधीत महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांकडून तीन ते चार दिवस टोल आकारु असे म्हंटले आहे.
Leave a Reply