
कोल्हापूर/प्रतिनिधी:कोल्हापूरातील सुप्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. प्रकाश गुणे, पत्नीअनुराधा गुणे व त्यांचे कुटुंबीय यांनी भारतीय सैन्यदलाच्या सशस्त्र सेनादले युद्धग्रस्त पुनर्वसन कोषात एक कोटी रुपयांचा मदत निधी देऊन कोल्हापूरकरांची दानशूर ही ओळख अधोरेखित केली. या त्यांच्या उत्तुंग कार्याबद्दल आज केएमएच्या सर्व माजी अध्यक्षांच्या समितीच्यावतीने डॉ. प्रकाश गुणे यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सेंटनरी कमिटीच्यावतीने डॉ. प्रकाश गुणे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
डॉ. गुणे यांना कोल्हापुरातील प्रसिद्ध कलाकार विजय टिपुगडे यांनी साकारलेली ऐतिहासिक संध्यामठीची कलाकृती भेट देण्यात आली. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सल्लागार डॉ. संदीप साळोके यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले “डॉ.गुणे यांचा सत्कार हा घरच्याच व्यक्तींनी केलेला सत्कार आहे. कारण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपद डॉ. गुणे यांनी भूषवलेले आहे. आपल्या देशाचे रक्षण करताना जखमी किंवा शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी एवढी मोठी रक्कम व वैयक्तिकरित्या देण्याची ही संकल्पना बहुधा प्रथमच असावी. आणि कोल्हापूरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. कोरोना महामारीमुळे वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व अधिक वाढले आहे. पण लोकांचा वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास कमी न होऊ देता त्यांना दिलासा देण्यासाठीच आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देखील डॉक्टर साळोखे यांनी दिली. सचिव डॉ. उद्धव पाटील यांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शतक महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
आपण दिलेल्या निधीचा चांगला विनियोग हा संरक्षण खात्यातच होईल असे वाटल्याने हा निधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सुपूर्त केला. एवढी मोठी रक्कम दिल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे डॉ. प्रकाश गुणे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले”. ते पुढे म्हणाले “कोल्हापूरला दातृत्वाची परंपरा आहे. लोकांसाठी झटण्याचा वारसा देखील आहे. गुणेंची ही चौथी पिढी सध्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. आत्ता प्रगत तंत्रज्ञान आले पण कोल्हापुरात कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसताना गुन्हे कुटुंबीय रुग्णांवर यशस्वी उपचार करत होते. या सत्कार समारंभास डॉ. हणमंत पाटील, डॉ. अजित चांदेलकर, डॉक्टर बी.जी जाधव-डेकरे उपस्थित होते.
Leave a Reply