
कोल्हापूर : सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील याच्या कुटूंबीयांना न्याय मिळावा याकरीता चांगल्या सरकारी वकीलांची नियुक्ती करावी आणि आरोपी मारुती उर्फ दत्तात्रय वैद्य व याला कठोर शिक्षा व्हावी याकरिता खासदार संजय मंडलिक यांचेसह सोनाळी येथील शिष्टमंडळ अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांना आज भेटले. दरम्यान वरद पाटील याचा खून होऊन पंधारे ते वीस दिवसांचा कालावधी होत आला. यामध्ये आरोपीने गुंन्हा कबूल केला गुन्ह्यामध्ये सबळ पुरावा मिळण्यासाठी पोलीस प्रशासन कसोशीने आपले प्रयत्न करत आहेत परंतु खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याने पोलीसांसमोर एक आव्हान उभे राहिलेले आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने तपास यंत्रणा लवकरात लवकर पुर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरीता सोनाळी येथील शिष्टमंडळासह खासदार संजय मंडलिक यांनी अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांची भेट घेतली.
Leave a Reply