
कोल्हापूर:शिवाजी पार्क येथील नागरी समस्यांची आमदार चंद्रकांत जाधव यांनी दखल घेतली व त्या सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश महानगरपालिका, पोलीस प्रशासन व भूमापन अधिकाऱ्यांना दिल्या.आमदार चंद्रकांत जाधव यांनी शिवाजी पार्क मधील नागरिकांशी संवाद साधत, विविध समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतानाच, त्या सोडवण्यासाठी तात्काळ संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन सूचना दिल्या. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या काम करण्याच्या पध्दतीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.शिवाजी पार्क मधील कचरा उठाव नियमीत होत नसल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याची तक्रार नगरीकांनी केली. यावर आमदार जाधव यांनी महानगरपालिका आरोग्याधिकारी जयवंत पवार यांना बोलवून घेतले. शिवाजीपार्क मधील कचरा उठाव करण्यासाठी कर्मचारी वाढवावेत, तसेच कचरा उठाव करणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या वाढवण्याच्या सूचना आरोग्याधिकारी जयवंत पवार यांना दिल्या. आमदार साहेबांच्या सूचनानुसार उद्यापासूनच कचरा उठाव दररोज केला जाईल असे पवार यांनी सांगीतले.भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. अमृत योजनेतून पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल. नवीन पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर नागरिकांची पाणी पुरवठ्याबाबत तक्रार राहणार नसल्याचे जलअभियंता अजित साळोखे यांनी सांगीतले.शिवाजी पार्क भागातील रस्त्याची दुरावस्था झाली असून, खडयातून मार्ग काढताना नागरिक व वाहनचालकांची तारांबळ उडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.
शिवाजी पार्क मधील रस्त्यासाठी सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे ; मात्र पावसामुळे काम करता येत नाही. त्यामुळे पावसाळा संपताच रस्त्याची काम सुरू करणार असल्याचे उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी सांगीतले.शिवाजी पार्क मधील जागेचे बी ट्युनर निघाले आहे ; मात्र आद्याप प्रोपर्टी कार्ड झाले नसल्याची तक्रार अजित आजरी यांनी केली. आमदार जाधव साहेब यांनी शहर भूमापन अधिकारी किरण माने यांना बोलवून घेतले व शिवाजी पार्क मधील जागेची प्रोपर्टी कार्ड करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची सुचना दिली.शिवाजी पार्क मधील खुल्या जागेत काहीजण मद्य पीत बसतात, त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना सर्वाधिक त्रास होत असल्याची तक्रार महिलांनी केली.
शाहूपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांना आमदार जाधव यांनी बोलवून घेतले व नागरिकांच्या तक्रारी सांगीतल्या. पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांनी उपस्थित नागरिकांना आपला मोबाईल नंबर दिला व खुल्या जागेत मद्यपान करताना कोणी दिसल्यास फोन करा, त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.ऍड के. ए. कापसे, प्रसाद मंत्री, अजित आजरी, सचिन मालू, रवी तजीनमणी, पियुष पुनातर, राजू लकडे, रमेश गुप्ते, सुशील पोवार, श्री. राजगोळकर, पंकज पोवार, बाबासाहेब महाडिक, शोभा कामत, भुषण पाटील, आनंद काळे, काळे मॅडम, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष नरेंद्र पायमल यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply