
जयसिंगपूर:बांधकाम कामगारांना दुपारचे व रात्रीचे मोफत भोजन ही महाविकास आघाडी सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या जेवणाचा दर्जा ढासळला अथवा जेवण वेळेत न मिळाल्यास थेट मला फोन करा, असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना केले. बांधकाम व इतर कामगारांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. ती करून मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.जयसिंगपूरमध्ये बांधकाम कामगारांच्या मोफत जेवण वितरण प्रारंभाच्या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर होते.आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, काबाडकष्ट करणाऱ्या कामगार वर्गाला पौष्टिक व दर्जेदार अन्न मिळावे, या भावनेतुन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही अभिनव योजना सुरू केली आहे. इमारत बांधकाम व इतर कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांसह त्याच्या कुटुंबीयांचही कोट -कल्याण करणाऱ्या योजना या मंडळामार्फत राबविल्या जात आहेत.
Leave a Reply