ग्राहकांना डिजिटली सक्षम करण्यासाठी फिनो पेमेंट बँकेचा’बँकींग गणेश’ उपक्रम

 

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही लाडक्या बाप्पाचे स्वागत करत , फिनो पेमेंट्स बँकेने डिजिटल बँकिंगद्वारे ग्राहकाच्या जीवनात समृद्धी आणण्याचे योजले आहे. श्री गणेश बँकींग पाँईटवर विराजमान होवून शुभाशिर्वाद देणार आहेत.उदयोन्मुख भारतीय ग्राहकांसाठी फिनटेक बँकेने शहराच्या विविध फिनो हमेशा बँकिंग पॉईंटवर श्रींच्या मूर्ती विराजमान आहेत. हातात एटीएम डेबिट कार्ड आणि मायक्रो एटीएम डिव्हाइस अशा रूपात गणेशाचे मनमोहक रूप लोकांना डिजिटल बँकिंग वापरण्यास प्रोत्साहित करते. फिनो पेमेंटस बँकेचा “बँकिंग गणेश “हा उपक्रम गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत सुरू राहील. फिनो पेमेंट्स बँकेच्या या पाॅईंटवर भाविक दर्शनासाठी येत आहेत.

फिनो पेमेंट्स बँकेचे अनिल पवार रिजनल हेड म्हणाले, कोविडनंतरचे भारतीय डिजिटल बँकिंगमध्ये अधिक वेगाने अनुकूल बदल होत आहेत. “पण अजूनही ग्राहकांचा एक मोठा वर्ग आहे ज्यांनी अद्याप डिजिटल बँकिंगचे फायदे समजले नाही. क्यूआर कोड (QR code) किंवा डेबिट कार्डद्वारे डिजिटल देणगी देण्याची परवानगी देऊन समाजातील या घटकाला डिजीटली सक्षम करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचा बँकेचा हेतू आहे.”
फिनोचे उद्दीष्ट हे ग्राहकांचे व्यवहार सुनिश्चित करणे आणि त्यांच्यातील डिजीटल बँकींगची भीती दूर करून डिजिटल व्यवहारांचे फायदे समजावणे हा आहे. हा उपक्रम फिनोच्या ग्राहकांना त्यांच्या सहाय्यक सेवांपासून सक्षमीकरणा (सेल्फ-मोड)पर्यंतच्या प्रवासाचा एक भाग आहे.फिनो पॉइंट्सवर, ग्राहक नवीन खाते 4 मिनीटाच्या आत उघडणे, घरगुती पैसे हस्तांतरण,, मायक्रो एटीएम आणि आधार सक्षम पेमेंट सिस्टम (एईपीएस) द्वारे पैसे काढणे इतर उत्पादने जसे आरोग्य, वीमा (लाइफ इन्शुरन्स) आणि पे युटिलिटी बिल आणि लोन ईएमआय यासारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रामीण भागातील लोकांचा या डिजिटल बँकींग ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.आता जिल्ह्यात चार शाखांसाह फिनोची तीन हजाराहून अधिक ग्राहक सेवा केंद्र ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहेत,असेही अनिल पवार यांनी यवलूज ता. पन्हहाळा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.पत्रकार परिषदेस फिनोचे क्लस्टर हेड बाबासाहेब पाटील, निलेश पाटील, अभिजीत यादव,सचिन आडनाईक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!