
कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को.ऑपरेटिव्ह बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी यंदा छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलने आता निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.या बँकेत सद्या सत्तारूढ पॅनेल व विरोधी परिवर्तन पॅनेल अशी दोन पॅनेल आहेत. कै.छन्नुसिंग चव्हाण यांच्या आशिर्वादाने आणि विश्वासराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील तिसरे पॅनेल आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे या बँकेची निवडणूक तिरंगी होईल. सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने गेल्या 35 वर्षात पहिल्यांदाच कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पॅनेल तयार केले आहे.स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्याबरोबरच कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज देण्याची भूमीका, नोकरभरतीत सभासदांच्या पाल्यांचा प्राधान्याने विचार करण्याची हमी या पॅनेलने आपल्या जाहीरनाम्यात दिली असल्याचे पॅनेल प्रमुख अनिल सरदेसाई यांनी स्पट केले. आज जाहीर केलेल्या जाहीरनाम्या आणखीन काही बाबी स्पष्ट केल्या आहेत, त्यामध्ये वयाच्या 55 व्या वर्षापुढील ज्या कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानितृत्त केले आहे, असे कर्मचारी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्यांनी लढा दिला आहे, अशा कर्मचाऱ्यांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार योग्य तो न्याय देऊ, बँक आपल्या दारी या संकल्पनेतून सभासद नोंदणी, कर्ज वेळेवर देण्यास प्राधान्या राहील. बँकेसाठी सुसज्ज इमारत उभारु, विम्यासह कर्ज तात्काळ उपलब्ध करुन देणार, जेणेकरून कर्जदाराच्या वारसावर व जामीनदारावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, गृहकर्ज उपलब्ध करून देण्यावर भर राहील, शासनाची उत्कृष्ट सेवा करणाऱ्या सभासदांचा व उत्कृष्ट शैक्षणिक कामगीरी करणाऱ्या सभादसांच्या पाल्यांचा गौरव करण्याची योजना राबविली जाईल. सभासदांसाठी मोफत आरोग्य शिबीर घेतले जाईल, तसेच बँकेच्या कोअर कमीटीमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी सभासदांचा समावेश करण्याची हमीही देण्यात आल्याचे अमित अवसरे यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेस राजाराम गंधवाले, राजेंद्र सावंत, तानाजी पाटील, रत्नमाला शिंदे, मीनाशी शिंदे, प्रदिप कल्गुटकी, संभाजी पोवार, उमेश सावंत, प्रकाश महाडेश्वर, दत्ता सुतार, श्रीकांत कोरवी,अमर वेटाळे यांच्यासह पॅनलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
Leave a Reply