स्कोडा स्लाव्हिया लवकरच भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार; बुकिंग सुरू

 

कोल्हापूर:स्लाव्हिया‘च्या सादरीकरणासह स्कोडा इंडियाच्या इंडिया 2.0 प्रोजेक्टच्या आगामी टप्प्याचा प्रारंभ झाला आहे. मध्यम-आकाराच्या एसयुव्ही कुशक ‘च्या लॉन्चनंतर यशस्वी पदार्पण करणारी नवीनकोरी सेदान झेक कारनिर्मितीकर्त्यांचे दुसरे इंडिया-स्पेसिफिक मॉडेल आहे. स्लाव्हियाच्या निर्मिती प्रक्रियेत 95% पर्यंतची लोकलायजेशन स्तर आहे. ही सेदान एमक्यूबी-ए0-इन मंचावर आधारित असून एमक्यूबी वेरीएंट खासकरून भारतासाठी स्कोडा इंडियाने स्वीकारला आहे – हे वाहन सुरक्षित वैशिष्ट्यांची सर्वसमावेशक श्रेणी आणि प्रगत इन्फोटेनमेंट यंत्रणा उपलब्ध करून देते. स्लाव्हियाचे टीएसआय इंजिन अनुक्रमे 85 केडब्ल्यू (115 पीएस)* आणि 110 केडब्ल्यू (150 पीएस)* याप्रमाणे आहे आणि कोणत्याही इतर स्कोडा मॉडेलप्रमाणे भावनेचा स्पर्श असणारे डिझाईन हे एक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. हे नाव म्हणजे कारनिर्मात्यांच्या आरंभांना आणि भारतीय बाजारातील नवीन युगाच्या चिन्हाला वंदना आहे.
स्कोडा ऑटोचे सीईओ थॉमस शाफर म्हणाले की, “नवीन स्लाव्हियासह आम्ही आमच्या इंडिया 2.0 प्रोडक्ट कॅम्पेनच्या पुढच्या टप्प्याचा प्रारंभ करत आहोत. कुशकच्या यशस्वी लॉन्चसह आम्ही आता आमच्या नव्याकोऱ्या आलिशान मध्यम आकाराच्या सेदानसह आणखी लोकप्रिय सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहोत. स्लाव्हियाची निर्मिती आमच्या भारतामधील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सुयोग्य पद्धतीने केली आहे आणि तिची बांधणी 95% लोकलायजेशनसह आहे. आम्हाला आत्मविश्वास वाटतो की, कुशक आणि स्लाव्हिया, दोन्ही सध्याच्या आश्वासक आणि वाढत्या बाजारपेठेत आम्हाला पूर्ण क्षमतेने चालना देईल.”
स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप बोपराय म्हणाले की, “कुशक सोबत आम्ही इंडिया 2.0 प्रोजेक्टची यशस्वी सुरुवात केली, भारतात वैश्विक भागीदारीत आम्ही जे कमावले त्याची ही ठळक वैशिष्ट्ये म्हटली पाहिजे. त्याशिवाय एसयुव्हीच्या वाढत्या मागणीनंतर आलिशान सेदानमध्ये अद्वितीय क्षमता देऊ करण्यात येतात आणि हा दबदबा आम्ही स्वत:हून निर्माण केला आहे. स्लाव्हिया नजाकतीने परिपूर्ण असून त्यात प्रतिष्ठा व स्टाईलचा मिलाफ आहे. स्कोडा ऑटोच्या नवीन वृद्धी युगाचा हा आरंभ आहे. नजाकती सोबतच सर्वोत्तम क्षमतेचे इंजिन आणि अनेक सिम्पली क्लेव्हर वैशिष्ट्यांसह स्लाव्हिया भारतातील ग्राहकांना लक्षवेधी उत्पादन घेऊन आली आहे. जगभरातील बाजारपेठेत तिचे कौतुक झाले. ऑक्टाव्हिया आणि सुपर्ब ‘ने तयार केलेले मापदंड स्कोडा स्लाव्हिया निर्माण करेल याविषयी आम्हाला आत्मविश्वास वाटतो आणि त्यामुळे या सेगमेंटमध्ये आमचे वर्चस्व अधिकच बळकट करायला मदत मिळणार आहे.”स्कोडा ऑटो इंडिया ‘चे ब्रँड डायरेक्टर झॅक होल्लीस म्हणाले की,कुशक ‘च्या लॉन्चसोबत आम्ही स्कोडा ऑटो इंडिया ‘त अभूतपूर्व वृद्धीचा अनुभव केला. कुशक ‘ने मध्यम आकाराच्या एसयुव्ही समवेत नवीन प्रदेश काबीज करत, आधुनिक भारताच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतिनिधित्व केले, स्लाव्हिया ‘च्या रूपाने एक ब्रँड म्हणून भारताची अस्सल आलिशान सेदान उपलब्ध करून देत आम्हाला आमच्या मुळाकडे परतून आणले. वाहन उद्योगाने फटके सहन करूनही आम्ही आमची प्रोडक्ट कॅम्पेन सुरू ठेवली. आमचे नेटवर्क 100 हून अधिक शहरांपर्यंत विस्तारत गेले. ब्रँड जागरूकतेला चालना मिळाली, ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवण्याचे आमचे वचन जपले गेले, व्यावसायिक विक्रेत्यांचे जाळे, मूल्यवर्धित सेवा सादर करण्यात आली आणि विक्री-पश्चात व्यवसायानंतर नवीन मापदंड निर्माण करण्यात आला. स्लाव्हिया आतून बाहेरून देखणी आहे आणि कुशक समवेत हा आमचा दुसरा व्हॉल्यूम ड्रायव्हर (आकारमानाला चालना देणारा घटक) आहे, कारण आम्ही भारतामधील आकारमानात महत्त्वाची वृद्धी कायम ठेवली आहे.”आपल्या रुबाबदार बांधणीसोबत स्कोडाने सुस्थापित भावनाशील भाषा तयार केली आहे, स्लाव्हियाने सेदानचे नवीन वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे. हे वाहन 1,752 एमएम रुंद असून सेगमेंटमधील विस्तृत ऑफर देते आणि पाच लोकांसाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून देते. या वाहनात 521 लिटर्सची विस्तारित बूटस्पेस आहे. प्रगत एलईडी तंत्रज्ञानासमवेत पुढचे हेडलाईट आणि टेललाईट प्रगत एलईडी तंत्रज्ञानासह उपलब्ध झाली आहे, त्यात स्कोडाचे सरधोपट क्रायस्टेलाईन डिटेल आहे. क्रोम-प्लेटेड डिझाईन आरेखन, टू-टोन अलॉय व्हील आणि विशेष स्कोडा बॅच यामुळे स्लाव्हियाला उच्च-गुणवत्तापूर्ण ‘फिल’ आहे. याचे नवीन मेटॅलिक क्रिस्टल ब्ल्यू आणि टोरनाडो रेड पेनवर्क भारतीय बाजारांत स्कोडाने खासकरून दाखल केले आहे.

सध्याच्या स्कोडा मॉडेल्समध्ये अंतर्गत जागेतील मध्यभागी फ्री-स्टँडींग इन्फोटेनमेन्ट डिस्प्ले आहे. नव्या स्कोडा स्लाव्हियाच्या केबिनमधील हा सर्वात उठून दिसणारा घटक आहे. खाली असणारी 25.4 सेंटीमीटरची टचस्क्रीन ही स्कोडा ग्रीलच्या चौकटीला अधोरेखित करते. डिस्प्लेचा वापर करताना हाताला आधार देण्यासाठी देखील याचा वापर करता येतो. ब्रँडची ओळख असलेले प्रशस्त केबिन हे विरुद्ध रंगांच्या समांतर ट्रीम स्ट्रिपमुळे उठून दिसते. सर्व बाजूंना असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गोलाकार एअर व्हेन्ट्सपर्यंत ते विस्तारलेले आहे. टू-स्पोक मल्टीफंक्शन स्टीअरिंग व्हीलच्या मागे डिजिटल इन्स्ट्रुमेन्ट क्लस्टर डिस्प्ले देण्यात आला आहे.
आडव्या, विरुद्ध रंगी सजावटीच्या स्ट्रीप प्रशस्त इंटीरियरला चालना देते आणि गोलाकार साईड एअर वेन्टसला जोडते.नवीन स्कोडा स्लाव्हियाच्या सर्व वेरीयंटमध्ये उपलब्ध असलेल्या इन्फोटेनमेंट सिस्टम सहज आणि स्वयंचलित तंत्राने आणि संपूर्णपणे रंगीत टचस्क्रीनद्वारे ऑपरेट केल्या जाऊ शकतात. हे स्मार्टलिंक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून एकात्मिक स्मार्टफोन-क्षम आहे. अ‍ॅम्बिशन आणि स्टाइल ट्रिम लेव्हल्स MyŠKODA Connect स्कोडा प्ले अॅप्ससह मोबाइल ऑनलाइन सेवा मोठ्या प्रमाणात प्रदान करतात, ज्याचा वापर टॉप-एंड इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी नेव्हिगेशन फंक्शन डाउनलोड करण्यासाठी केला जाऊ शकतो.स्कोडा स्लाव्हिया सर्वोत्तम सक्रीय आणि कार्यशील सुरक्षा वैशिष्ट्यासह उपलब्ध होते. यामध्ये बसणाऱ्या प्रवाशांना सहा एअरबॅग्जची सुरक्षा मिळते. लहान मुलांचा प्रवास सुरक्षित व्हावा याकरिता सेदानमध्ये आयएसओफिक्स अँकर आणि टॉप टेथर मागच्या सीटला देण्यात आले आहेत. ईएससी हे आणखी एक वैशिष्ट्य असून ते उच्चतम पातळीची ड्रायव्हिंग सुरक्षा प्रदान करतात. यामध्ये देण्यात आलेले मल्टी-कोलीजन ब्रेक सुरक्षेची खातरजमा करतात. अपघातादरम्यान वाहन एका जागेवर स्थिर राहते. स्लाव्हियात वास्तविक आरामदायी वैशिष्ट्ये जसे की, हिल-होल्ड कंट्रोल, पाऊस आणि वीज सेन्सर व क्रुझ कंट्रोल देण्यात आले आहे. टायर प्रेशर मॉनिटर हे आणखी एक सुलभ वैशिष्ट्य आहे.स्कोडा ऑटो इंडिया 2.0 कॅम्पेनचे नेतृत्व करते, ज्यामध्ये भारतातील फॉक्सवैगन ग्रुपच्या सर्व क्रियाकलापांचा समावेश आहे आणि या कॅम्पेनला एक बिलियन युरोज गुंतवणुकीची क्षमता प्रदान करण्यात आली आहे, ज्यामुळे स्कोडा व फॉक्सवैगनचे भारतीय उपखंडात दीर्घकालीन अस्तित्व बळकट होईल. 2025 पर्यंत एकत्रित बाजार हिस्सा 5% पर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.एमक्यूबी-ए0-इन – फॉक्सवैगन ग्रुप’च्या मोड्युलर ट्रान्सवर्स मेट्रिक्सचे वेरीयंट – नवीन स्कोडा मॉडेल्सना तांत्रिक आधार पुरवतो. स्कोडा ऑटो ‘ने या मंचावर खासकरून भारतीय बाजारपेठेसाठी स्वीकार केला आहे. त्यामुळे देशाच्या नवीन, कठोर सुरक्षा आणि उत्सर्जन गरजा गाठायला मदत मिळेल. बहुतांशी विकास कार्य हे भारतात पूर्ण होते – त्यात झेक प्रजासत्ताकच्या सहयोगींचा सहभाग असतो – 2019 च्या पूर्वार्धात पुणे येथे उघडण्यात आलेल्या टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये कामकाज चालते. ऑन-साईट काम करणाऱ्या टीमकडे प्राविण्य आहे. स्कोडाने स्थानिक गरजा समजून घेतल्याने अत्यंत लवचीक पद्धतीने, वेळेवर सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. स्कोडा ऑटो’ च्या भारतामधील वाहन निर्मितीचा स्तर 95% पर्यंत आहे. कारनिर्मात्याने त्यांच्या पुणे प्रकल्पात नवीन एमक्यूबी प्रोडक्शन लाईन निश्चित केली आहे, ज्यामुळे हे शक्य झाले. मध्यम कालावधीत भारतात निर्मिती होणाऱ्या मॉडेलची निर्यात अन्य देशांत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!