
मुंबई: अनुपम खेर हे भारतीय सिनेमावर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आगळा ठसा उमटवलेले अनुपम खेर यांचा 522वा सिनेमा ‘कनेक्ट’ लवकरच प्रदर्शित होतो आहे. या सिनेमात खेर यांच्यासह दक्षिणेतली लेडी सुपरस्टार नयनतारा हीसुद्धा मुख्य भूमिकेत आहे.
सोबतच अश्विन सर्वनन आणि विग्नेश शिवन हेसुद्धा सिनेमात लक्षवेधी भूमिकेत आहेत. खेर यांनी ‘कू’वर सिनेमाचे पोस्टर शेअर करत शब्दात आपल्या भावना मांडल्या आहेत.
“माझा 522 वा चित्रपट हा तमिळ चित्रपट असणार आहे. आभार प्रिय नयनतारा, अश्विन सर्वनन आणि विग्नेश शिवन आणि रॉवडी पिक्चर्सशी जोडलेल्या सर्वांचे. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि कौतुक उर्जा देणारे आहे. ‘कनेक्ट’ या सिनेमाचा भाग असणे मला सुखावून गेले. इतक्या कुशल, बुद्धीमान टीमसोबत काम करण्याचा अनुभव खास होता. तुम्हा सगळ्यांची थिएटरमध्ये वाट पाहेन… जय हो!!”
‘कनेक्ट’च्या डार्क थीम असलेल्या पोस्टरमध्ये 66 वर्षांचे खेर एका धर्मगुरूच्या वेषात दिसत आहेत. सोबतच पोस्टरवर लिहिलं आहे, “अनुपम खेर तुमचं स्वागत आहे.”
या सिनेमाव्यतिरिक्त खेर यांचे इतरही अनेक सिनेमे येत्या काळात पहायला मिळतील. ‘द काश्मिर फाइल्स’ रिलीजसाठी तयार आहे. विवेक अग्निहोत्रीने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात मिथून चक्रवर्तीनेही काम केले आहे. याशिवाय अनुपम खेर सध्या आगामी चित्रपट ‘ऊंचाई’च्या चित्रिकरणात व्यस्त आहेत.
Link for Embed
“https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=6bfeba21-2b07-4885-ad7d-de3506432a7c” href=”https://www.kooapp.com/dnld”
“https://www.kooapp.com/koo/anupampkher/6bfeba21-2b07-4885-ad7d-de3506432a7c”
Leave a Reply