
मुंबई लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली सोशल मीडियावर सक्रिय असतो. चाहतेसुद्धा त्याचे फोटो आणि व्हीडिओज लगोलग उचलून धरत असतात.नुकताच विराटने कू वर पोस्ट केलेला एक रोमॅंटिक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. यात विराट आणि अनुष्का पाठमोरे बसलेले आहेत. आजुबाजुची खडकाळ जमिन, हिरवाई आणि खळाळत वाहणारी नितळ नदी असा फोटोतला आकर्षक माहोल आहे. यात अनुष्का आणि विराट अगदी निवांतपणे नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आहेत.विराटने लिहिले आहे, “तुझ्या बाजुला असतो तेव्हा मला कुठेही असलो तरी घरी असल्यासारखं उबदार वाटतं.” पोस्टखाली त्यानं #anushkasharma असा हॅशटॅगही दिला आहे.विराटच्या या कू पोस्टला आठशेहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 47 लोकांनी री-कू आणि 70 लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.टी-20 वर्ल्डकपनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या विराटने आता पुनरागमन केले आहे. मुंबईत न्युझीलॅंडविरूद्ध होणाऱ्या मॅचमध्ये तो खेळणार आहे. विराटने मुंबईच्या CCI मध्ये सराव आणि व्यायामही सुरू ठेवला आहे. त्याचा अत्यंत आव्हानात्मक व्यायाम करत घाम गाळतानाचा व्हीडिओही व्हायरल झाला आहे.
Embed Koo link
<blockquote class=”koo-media” data-koo-permalink=”https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=a7ff57a3-2209-41d8-bca0-49081dab154b”
Leave a Reply