
येत्या डिसेंबरमध्ये बंहोणाऱ्या प्रो कबड्डी सीझनसाठी कबड्डीचे सगळेच संघ घाम गाळत आहेत. पुणेरी पलटनसह ‘यु मुंबा’सुद्धा कसून सराव करत आहे. ‘खूप सारा जोश घेऊन दिवसाची उत्साही सुरवात’ असा फोटो यु मुंबाने पोस्ट केला आहे. यात संघातले तीन दमदार खेळाडू व्यायाम करताना दिसत आहेत. सोबतच दुसरा फोटोही आकर्षक आहे. यात थरारक पद्धतीने प्रतिस्पर्ध्याला जखडण्याचा सराव टीम करते आहे. कमालीचा ॲक्शनपॅक्ड असा हा फोटो चाहत्यांनी उचलून धरला आहे.
“हल्ला करणारा आता तावडीत सापडला आहे, की तो पकडीतून सुटून जाईल?” असा प्रश्न या फोटोवर यु मुंबाने विचारला आहे. सोबतच त्यांनी #UMumba | #MeMumba | #Mumboys | #WeAreMumba | #WeAreMumbai | #AbKooPeKabaddi असे हॅशटॅग वापरले आहेत.
‘कू’ वरचे बहुभाषिक फीचर्स वापरून ‘यू मुंबा’ खास मराठी, हिंदी आणि इंग्रजीत कू करत असते. टीमने सतत शेअर केलेले फोटोज आणि व्हीडिओज चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.
2015 साली प्रो कबड्डी लीगचा विजेता असलेला यु मुंबा संघ या सीझनमधला एक उत्कृष्ट संघ म्हणून नाव कमावून आहे. कबड्डी हा देशी खेळ आहे. प्रो कबड्डी लीगने कबड्डीला नवी लोकप्रियता मिळवून दिली आहे. कबड्डी आता चाहत्यांसह नव्याने उद्याला येणाऱ्या खेळाडूंचाही जोरदार प्रतिसाद मिळवते आहे. अशावेळी विविध ताकदीच्या टीम्स ‘कू’वर दाखल झाल्याने या प्रतिसादाला आणखीच धार चढेल यात शंका नाही.
=”https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=a9f7c6d9-6368-4a51-bef9-7ba6c1ea61c4″
Leave a Reply