
कोल्हापूर/प्रतिनिधी:कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मतदारांना शब्दाला जागणारा आमदार मिळाला असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक भूपाल शेटे यांनी काढले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची निवडणूक झाली आणि काही कालावधीतच कोरोनाचे संकट आले. अशा कठीण काळातही मतदारांना विकास कामांबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल मेहता पार्क, वर्षा नगर, वृंदावन पार्क सुभाष नगर, जवाहर नगर, प्रतिभानगर परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार ऋतुराज पाटील याचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मतदारांना शब्दाला जागणारा आमदार मिळाला असल्याची भावना नगरसेवक भूपाल शेटे यांनी सत्कार समारंभ प्रसंगी बोलतांना व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देतांना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, आमदार झातयानंतर कोरोनाच्या सावटामुळे प्रत्यक्ष मतदरांपर्यंत पोहचण्यात अडचणी आल्या. ज्या ज्या ठिकाणी पदयात्रा काढल्या, बैठका घेतल्या जनतेचे प्रश्न जाणून घेतले, त्या सोडवण्याच्या दृष्टीने कामही सुरु केले. कोरोनामुळे विकास कामांना निधी खर्च करता आला नाही. आता कोरोनाचं सावट कमी झाले असून विकास कामांना निश्चित गती मिळेल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
बुद्ध गार्डन प्रभागातील मेहेता काँलनी येथील हवामहल ते अँस्टर आधार रोडपर्यत गेली पंधरा वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आम. ऋतुराज पाटील, नगरसेवक भूपाल शेटे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शेटे, शर्मिला सामंत, अमोल जाधव,अनिल घाटगे यांच्या उपस्थितीत पार पडला. वृंदावन काँलनी वर्षनगर,संत राहिदास नगर,जवाहरनगर शाहू सेना चौक, पारस हाँस्पिटल ते दत्त स्टेशनरी दुकान यासह सुभाष नगर , जवहारनगर परिसरातील ड्रेनेज गटर्स आणि डांबरीकरण रस्त्याचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाल शेटे, राजू साबळे,हरिदास सोनवणे, नियाज खानअरुण कुराडे,प्रविण बने, शिवाजी पोळ महेश बागडे , राहुल सोनवणे अशोक पोळ विजयपूर उदय चव्हाण हरिदास सोनवणे निरंजन कदम, गोपी हटकर ,अनिल शिंदे यांच्या सह या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.
Leave a Reply