शितोळे हॉस्पिटलची नवी वाटचाल “वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची” सुरुवात

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील सर्वानाच परिचित असलेल्या शितोळे हॉस्पिटलने आता आपली आणखी नवी वाटचाल सुरू केली आहे.वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची सुरुवात येथील महावीर कॉलेज जवळील पॅलेस रोडवर केली आहे.या युनिटचे उदघाटन १८ डिसेंम्बर रोजी अँपल सरस्वती हॉस्पिटलचे डॉ. अशोक भूपाळी यांच्या व शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. डि.टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी गोकुळ संचालक श्री.अरुण डोंगळे, आराम गादी कारखाना श्री.अविनाश वाडीकर,लकी फर्निचरचे श्री.राजेंद्र बडे,,माजी डी. वाय. एस. पी श्री.सुरेश पवार, श्री.मदन घाडगे आणि विवेकानंद कॉलेजचे चेअरमन अभयकुमार साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.या युनिटच्या माध्यमातून सर्व तपासण्यांची सोय आकर्षक सवलतीच्या दारामध्ये एकाच छताखाली उपलब्ध होणार असे डॉ. महेश्वर शितोळे यांनी सांगितले. तसेच अंथरुणावर झोपलेल्या रुग्णांना घरी जाऊन तपासणी पासून ते औषध देण्यापर्यंतची सोय ही याठिकाणी केली गेली आहे असे सांगितले.या युनिटचा प्रमुख उद्देश कोणताही आजार होण्याआधी त्याची प्रतिबंधात्मक काळजी घेणे दीर्घकालीन आजार उदाहरणार्थ मधुमेह, उच्च रक्तदाब, थायराइड ,संधिवात, मानसिक आजार, पी-सी-ओ-डी, वंधत्व, दातांचे व हिरड्यांचे आजार तसेच या आजारांपासून होणाऱ्या इतर समस्या टाळण्यासाठी अचूक निदान करून वेळेत मार्गदर्शनाने उपचार करणे तसेच सध्या डब्ल्यूएचओ प्रमाणे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही खूप गरजेचे आहे त्यामुळे रुग्णाची इच्छाशक्ती वाढते रुग्णांचा सकारात्मक दृष्टिकोन वाढत जातो आणि त्यामुळे तो रुग्ण मानसिकदृष्ट्या खंबीर होऊन कोणत्याही आजारावर मात करू शकतो त्यासाठी मेडिकल अँस्ट्रोलॉजी ओ.पी.डी सुरू केली असल्याचे डॉ.शितोळे यांनी सांगितले.

त्यामध्ये रेकी आणि टॅरो कार्ड मार्गदर्शन रेकी मास्टर युगंधरा दुधाळे या देणार आहेत तसेच मधुमेह मुळे डोळ्यांच्या समस्यांचे प्रमाण किती आहे याची तपासणी करण्यासाठी नेत्ररोग तज्ञ डॉक्टर माने यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच बालरोग विभाग आणि स्त्रीरोग विभाग ही या ठिकाणी कार्यरत असून या युनिटच्या माध्यमातून मधुमेह डोळ्यांचे शिबिर मधुमेह चार पायाचा बधिरपणा, मधुमेह दातांची इजा,मधुमेह स्त्रियांचे आजार तसेच मधुमेह बालकांचे आजार तसेच रेकी आणि कुंडलिनी योगा कोर्सेस शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे असेही सांगितले. यावेळी डॉ आशा शितोळे,डॉ. डी. जी.शितोळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!