कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे नेतृत्व कोल्हापूर उत्तर पुरते मर्यादित नसून, मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना दिलेल्या पदातून राज्यातील ३६ जिल्ह्यांचे नेतृत्व श्री.राजेश क्षीरसागर करत आहेत. त्यांच्या पदास कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असून, श्री.राजेश क्षीरसागर यांना राज्याच्या कार्यपद्धतीत सामील होण्याचा, निधीमंजुरी साठी पाठपुरावा करण्याचा अधिकार आहे. गांधीनगर सह इतर गावांना नळ पाणी पुरवठा योजनेतून निधी मंजूर करावा, यासाठी श्री.राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला असून, गेल्या महिन्यात पाणीपुरवठा मंत्री नाम.श्री.गुलाबराव पाटील यांना पत्रही दिले आहे. ही योजना मंजूर झाली, तशी माहिती पाणीपुरवठा मंत्री नाम.श्री.गुलाबराव पाटील यांचे कार्यालयाकडून श्री.राजेश क्षीरसागर यांना मिळाली. त्यानुसार योजना मंजूर झाल्याचे श्री.राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केले. सदर योजना मंजूर होवून त्याची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, आज दि.२७.०१.२०२२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलवून ती जाहीर करण्यात येणार होती, परंतु, पालकमंत्री नाम.सतेज पाटील हे कोरोना ग्रस्त असल्याने त्यांनी पाणीपुरवठा मंत्री नाम.श्री.गुलाबराव पाटील यांना विनंती केल्याने व यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनीही मान्यता दिल्याने पुढील आठवड्यात सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलवून प्रशासकीय मान्यता जाहीर करण्यात येणार आहे. याची माहिती आम.ऋतुराज पाटील यांना नसल्याने त्यांचे वक्तव अज्ञानातून असल्याचे प्रतिउत्तर शिवसेना शहरप्रमुख श्री.जयवंत हारुगले यांनी दिले आहे. गांधीनगर पाणी योजना निधी मंजुरीबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यावर केलेल्या टीकेस आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे श्री.जयवंत हारुगले यांनी उत्तर दिले.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, शिवसेनाप्रमुखांचे विचार अंगात भिनलेला, सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता म्हणून श्री.राजेश क्षीरसागर यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व एकाच मतदारसंघापुरत मर्यादित नाही आणि एकाच मतदारसंघापुरते काम करण्याएवढे ते संकोचित मनाचे नाहीत. श्री.राजेश क्षीरसागर यांच्या कार्यातून त्यांची कोल्हापूर वासियांसाठीची तडफड दिसून येते. गांधीनगर पाणी योजनाच काय पण रु.२३७ कोटी ४७ लाखांच्या रु.नगरोत्थान निधी, मुलभूत सोयी सुविधा रु.१५ कोटींचा निधी, रंकाळा तलावाचा रु.१० कोटींचा निधी हा श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यानेच मंजूर झाला आहे. रंकाळा तलावास मंजूर निधीतील बहुतांश प्रस्तावित कामे दक्षिण विधानसभा मतदार संघातील आहेत. याबाबत त्यांनी प्रशासनास का विचारणा केली नाही? श्री.राजेश क्षीरसागर यांनी रंकाळा तलावासाठी मंजूर केलेला निधी परत जावा, निधीचे श्रेय श्री.क्षीरसागर यांना मिळू नये म्हणून, नवीन डी.पी.आर करण्याची मागणी करणाऱ्या आम.कै. चंद्रकांत जाधव यांच्या पत्रावर कोणी- कोणी सह्या केल्या आहेत? हे पत्र जर श्री.राजेश क्षीरसागर यांनी जनतेसमोर जाहीर केले तर निधीस कोण- कोण विरोध करते याचे पितळ जनतेसमोर उघडे पडेल.
आम.ऋतुराज पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीस नव्याने सुरवात झाली आहे. परंतु, टीका करताना कोणावर करावी आणि कोणत्या थरावर जावून करावी, याचे भान त्यांनी नक्कीच जपले पाहिजे. टोल, एल.बी.टी., थेट पाईपलाईन आदी कोल्हापूरच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी श्री.राजेश क्षीरसागर रस्त्यावर आणि विधानसभेत लढत होते तेव्हा आपण महाविद्यालयीन जीवन जगत होता, याचा विचार करून आम.ऋतुराज पाटील यांनी टीकेची वैचारिक पातळी ठरवावी. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर व पालकमंत्री नाम.सतेज पाटील यांचे पक्ष वेगळे असले, वैचारिक मतभेद असले तरी त्यांचे एकमेकांचे चांगले संबध आहेत. पालकमंत्री नाम.सतेज पाटील यांना अशा टिकांची किम्मत चुकवावी लागली आहे. कारण अशा टीका जनतेच्या मनात रुजत नाहीत. विकास कामासाठी आणलेल्या निधीचे स्वागत करण्याऐवजी टीका करण्यात वेळ व्यर्थ घालवू नये. आम.ऋतुराज पाटील यांनी टीकेची भूमिका सोडून विकासास साथ द्यावी, असा सल्ला शिवसेना शहरप्रमुख श्री.जयवंत हारुगले यांनी दिला.
गांधीनगर सह इतर गावांना मुबलक पाणी पुरवठा होत असेल तर गावकरी विरोध का करतील? गावाच्या भल्यासाठी होणाऱ्या गोष्ठीसाठी कोणतेही गाव विरोध करत नाही. यासह पाणीपुरवठा मंत्री नाम.श्री.गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे मंत्री आहेत. या योजनेचा निधी शिवसेनेच्या मंत्री महोदयाकडून मिळतोय, म्हणजेच शिवसेनेकडून मिळतोय, याचा विसर आम.ऋतुराज पाटील यांना पडला असावा. दक्षिण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, तिथल्या लोकांना विश्वासात घेवून योजना मार्गी लागण्यासाठी शिवसेना योगदान देईल. यातील अनेक गावातील गावकऱ्यांच्या जमिनीवर एम.आय.डी.सी. चे शिक्के होते ते शिक्के श्री.राजेश क्षीरसागर यांनी उद्योगमंत्री नाम.श्री.सुभाष देसाई यांच्या निदर्शनास आणून कमी केले. त्यावेळी दक्षिण मतदारसंघासाठी आपण काम करतोय, अशी संकोचित भावना न ठेवता श्री.राजेश क्षीरसागर यांनी काम केले आहे. त्यामुळे गांधीनगर सह दक्षिण विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून, याठिकाणी शिवसेना निवडणूक लढवू शकते आणि जिंकून दाखवू शकते.
आम.ऋतुराज पाटील यांनी महाविकास आघाडीचा उल्लेख केला. पण, महाविकास आघाडीची खरी जाणीव ठेवण्याची गरज कोणाला आहे हे जनतेला माहित आहे. शिवसेना महाविकास आघाडी म्हणूनच कार्य करते, घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेवूनच शिवसेना काम करते. नळ पुरवठा योजनेची प्रशासकीय मंजुरी झाली असून, आज दि.२७ जानेवारी रोजी ही मान्यता जाहीर करण्यात येणार होती. परंतु, पालकमंत्री नाम.सतेज पाटील हे आजारी असल्याने त्यांनी पाणीपुरवठा मंत्री नाम.श्री.गुलाबराव पाटील यांना विनंती केली कि पुढच्या आठवड्यात प्रशासकीय मान्यता जाहीर करावी. यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनीही मान्यता दिल्याने पुढील आठवड्यात शिवसेना, कॉंग्रेस- राष्ट्रवादी सर्वांसोबत मिळून या योजनेची प्रशासकीय मान्यता जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीचा धर्म पाळतच आहे. सोयीपुरते सवता-सुभा मांडण्याची भूमिका शिवसेनेत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा उल्लेख करणारे आम.ऋतुराज पाटील गोकुळ मधील वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव, मुरलीधर जाधव यांची नियुक्ती, जिल्हा बॅंकेतील भाजपची सलगी याबाबत गप्प का?
श्री.राजेश क्षीरसागर हे एका मतदारसंघापुरते मर्यादित नाहीत. ते कट्टर शिवसैनिक म्हणून काम करतात, शिवसेना पक्षाची वाढ होण्याकरिता काम करणे स्वाभाविक आहे. तर कोल्हापूर वासीय म्हणून कोल्हापूरच्या प्रत्येक प्रश्न मार्गी लागण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पुढील काळात श्री.राजेश क्षीरसागर हे विकासात्मक कार्य असेच पुढे ठेवतील, असेही श्री.जयवंत हारुगले यांनी म्हंटले आहे.
Leave a Reply