
कोल्हापूर/प्रतिनिधी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉक्टर अथर्व संदीप गोंधळी यांने यंगेस्ट बर्गमॅन होण्याचा बहुमान मिळविला आहे.डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील बर्गमॅन ११३ या स्पर्धेमध्ये डॉ.अथर्वने स्विमिंग १.९ किलोमीटर, सायकलिंग ९० किलोमीटर रनिंग २१ किलोमीटर अशी सलग नऊ तास असणाऱ्या या स्पर्धेमध्ये त्याने सहभागी होऊन ६ तास ३४ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. या स्पर्धेत देशभरातील ९०० स्पर्धक सहभागी झाले होते.खूप कमी वयात आणि कमी वेळेत अथर्वने ही स्पर्धा पूर्ण केली असून त्यामुळे डॉक्टर अथर्व यंगेस्ट बर्गमॅन ठरला आहे. यामुळे त्याचे सर्व स्तरातून खूप कौतुक होत आहे. डॉ अथर्व तायक्वांदो मध्ये अकराव्या वर्षी ब्लॅक बेल्ट झाला आहे त्याने अनेक सुवर्ण आणि रौप्य पदके त्याने मिळवली आहेत. ३० नोव्हेंबर २०१९ रोजी त्याने सलग बारा तासात २९६ किलोमीटर सायकलिंग करून सहा वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्ड बनविले होते आतापर्यंत १० वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंद आहेत. RTO कोल्हापूर व कराड सायक्लोथॉनचे अथर्व ब्रँड अँबेसिडर आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांला डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे.यापूर्वी यंगेस्ट मल्टी टॅलेंटेड स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ,बाल रत्न इंडियन एक्सलन्स, करवीर आयकॉन, क्रीडा रत्न ,क्रीडा भूषण, ब्रँड कोल्हापूर, बेस्ट अँथलेट,रायझिंग स्टार अशा अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय व प्रादेशिक पुरस्काराने अथर्वला सन्मानित करण्यात आले आहे.
२६ जानेवारी २०२२ रोजी विद्यामंदिर ग्रामपंचायत संभापूर येथे त्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिद्द चिकाटी परिश्रम व वेळेचे नियोजन असेल तर यशाला गवसणी घालता येते अथर्वने या गोष्टीला प्रथम प्राधान्य दिले आणि त्याने हे यश प्राप्त केले आहे यासाठी अथर्वला प्रशिक्षक पंकज रावळू,आशिष रावळू क्रीडाशिक्षक विक्रम सिंह पाटील रविराज पवार यांचे मार्गदर्शन व कॉलेजच्या प्राचार्य माहेश्वरी चौगुले यांचे प्रोत्साहन व संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके,उदय पाटील, वैभव बेळगावकर यांचे सहकार्य लाभले आहे या सर्व माझ्या यशामध्ये आई-वडिलांचा शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे असे अथर्वने बोलून दाखविले आहे.
Leave a Reply