‘झुंड’ सिनेमा 4 मार्चला होणार प्रदर्शि ‘कू’वर तरण आदर्श यांची माहिती 

 

दीर्घकाळापासून सिनेरसिकांना ज्याची उत्सुकता लागून राहिली आहे तो सिनेमा म्हणजे ‘झुंड’. हा बहुचर्चित सिनेमा आता येत्या 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे. ‘कू’वर पोस्ट करत तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.अभिनयातला बाप माणुस म्हणजे अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शनात आपला अनोखा ठसा उमटवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे नागराज मंजुळे. ‘झुंड’ हा अमिताभ बच्चन यांचा अभिनय आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाने सजलेला सिनेमा असणार आहे. यात एका फुटबॉल प्रशिक्षकाचा प्रवास आणि संघर्ष पहायला मिळेल. ‘झुंड’ गेल्या वर्षी 18 जूनला प्रदर्शित होणार होता. मात्र ही तारीख पुढे ढकलण्यात आली.विशेष म्हणजे, हा सिनेमा सत्यकथेवर आधारित आहे. विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाने मागे समाजातील गरिबीशी झुंजणाऱ्या मुलांना घेऊन फुटबॉलची टीम बनवली होती. त्यांच्याच आयुष्यावर हा सिनेमा आहे.
 
Check this post from @taran_adarsh on Koo App: 
 
“AMITABH BACHCHAN: ‘JHUND’ ARRIVES ON 4 MARCH 2022… #Jhund …” 
https://www.kooapp.com/koo/taran_adarsh/b12b0eb9-fb4b-4570-b913-1434a496fe28
 
Download Koo App
https://www.kooapp.com/dnld

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!