
कोल्हापूर: अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या
शाळा व्यवस्थापनाबाबत काही पालक विनाकारण आणि कथित आर्थिक फसवणुकीचे खोडसाळ आरोप करून संस्थेची बदनामी करत असलेचे निदर्शनास आले आहे. स्कूलने गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात एक चांगली शैक्षणिक संस्था म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पालकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण केली आहे. स्कूलने कोविड काळातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून नियमांचे पालन करून परिस्थितीनुरूप ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ऑनलाईन शिक्षण सुविधा विद्यार्थ्यांना देत असताना शाळेने विद्यार्थ्यांना जादा तासिका, समुपदेशन कार्यशाळा, वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडामहोत्सव असे सहशालेय उपक्रम सुविधा शालेय फी व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचा अन्य आर्थिक मोबदला न घेता उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना स्विमिंग, घोडेस्वारी तसेच विविध खेळांचे प्रशिक्षण, संगीत प्रशिक्षण सुविधा, शालेय फी व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचा अन्य आर्थिक मोबदला न घेता शाळा उपलब्ध करून देते. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलमध्ये पालक-शिक्षक संघ अस्तित्वात आहे व त्यांच्या सभा होतात. स्कूल व्यवस्थापन, शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थी, पालकांना सौजन्याची, समानतेची वागणूक
दिली जाते. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुल ही विनाअनुदानित शाळा आहे. विद्यार्थ्यांकडून मिळणारी फी हेच प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत आहे. काही पालक पाल्याची थकीत फी द्यावी लागू नये म्हणून संगनमताने व दुर्भावनेने शाळेची बदनामी करत आहेत. थकीत फी शाळा आदा करणे पालकांची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. शाळा व्यवस्थापनामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले नाही. सत्य वस्तुस्थितीची शहानिशा न करता
शाळेची बदनामी करण्याच्या हेतूने व आपले इप्सित साध्य करण्याच्या गैरहेतूने काही विघ्नसंतोषी पालकांनी पत्रकार परिषद घेवून शाळा व शाळा-व्यवस्थापनाविरुद्ध खोडसाळ आरोप केले आहेत. त्याबाबत शाळा व्यवस्थापन संबंधित पालकांचेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
Leave a Reply