
कोल्हापूर:समन्वयाने चित्रपट प्रदर्शित केल्यास सर्वांनाच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, असा आशावाद दिग्दर्शिक आशीष कैलास जैन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल” या चित्रपटाची निर्मिती आरती चव्हाण यांची असून दिग्दर्शन आशीष कैलास जैन करीत आहेत. अभिनेता तेजस बर्वे, अभिनेत्री अमृता धोंगडे, माधुरी पवार यांच्याबरोबर ‘दिशाभूल’मध्ये युवा अभिनेता अभिनय बेर्डेचीही प्रमुख भूमिका आहे. अभिनेते नागेश भोसले, अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेता प्रणव रावराणे, शुभम मांढरे, रुही तारू, अरुण कदम, सिद्धेश्वर झाडबुके, आशुतोष वाडेकर, शरद जाधव, मंदार कुलकर्णी, गौतमी देवस्थळी अशी इतर तगडी स्टारकास्ट आहे. ‘दिशाभूल’ चे डीओपी वीरधवल पाटील आहेत तर चित्रपटाला क्रिस मस्करेन्हस, प्रथमेश धोंगडे यांचे संगीत व गीते हरिभाऊ धोंगडे यांची आहेत. नृत्य दिग्दर्शन नील राठोड, कला दिग्दर्शन वैभव शिरोळकर, वेशभूषा शीतल माहेश्वरी, मेकअप राजश्री गोखले, संकलन विनोद राजे, ध्वनी निलेश बुट्टे यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
पुणे, गोवा आणि आता रत्नागिरी येथील कोळथरे बीच येथील विविध लोकेशनवर सध्या चित्रीकरण सुरू आहे. या दरम्यान श्री. जैन बोलत होते. ते म्हणाले, कोरोनानंतर हळूहळू चित्रपटगृहे सुरू होण्याबरोबरच प्रेक्षकही चित्रपटगृहांकडे वळत आहेत. मात्र एका दिवशी चार चार चित्रपट प्रदर्शित होत आहे. अशावेळी आपणच आपले नुकसान करून घेत आहोत. यासाठी निर्माता-दिग्दर्शकांनी प्रत्येकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रदर्शनावेळी विचारविनिमय केल्यास प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळेल. दिशाभूल चित्रपट एक आव्हान होते. युवा पिढीला प्रतिनिधित्व करणारा चित्रपट सर्वांना आवडेल. अभिनेता अभिनय बेर्डे म्हणाला, ‘दिशाभूल’ हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेलला चित्रपट आहे. यातील माझी व्यक्तिरेखा ही मी आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे.
लोकेशन शोधताना प्रत्येकाची दिशाभूल
रत्नागिरी येथे दापोली येथील निसर्गरम्य अशा कोळथरे बीच व आसपास परिसरातील सध्या चित्रीकरण सुरू आहे. यावेळी चित्रीकरण स्थळ शोधताना मात्र चित्रपटाच्या टीमबरोबर इतरांचीही दिशाभूल होत आहे.
Leave a Reply