
बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसह सोशल मीडियावर ती ज्या पोस्ट करत असते त्या लक्षवेधी असतात.आपल्या फॅशन सेन्ससह फिटनेससाठीही श्रद्धा ओळखली जाते. आपल्या फोटोजसह विविध रंजक व्हीडिओही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आताही तिने एक खास पोस्ट ‘कू’वर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.आठ दशके अखंड गात रसिकांना मुग्ध करणाऱ्या प्रतिभावंत गायिका लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारी सुरेख पोस्ट श्रद्धा कपूरने केली आहे. यात ती म्हणते, ‘मी लताजींसह काही क्षण घालवले होते. ते क्षण मी कायमच माझ्या ह्रद्यात जपून ठेवेन. लतादीदी, मला आठवतं, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. किती आश्वासक नजर आणि प्रेमळ शब्द होते तुमचे… खरोखर एक साधं तरीही दैवी, रुबाबदार आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व! लव्ह यू लताजी!’आपला बालपणीचा लतादीदींसोबतचा दुर्मिळ फोटो श्रद्धा कपूरने शेअर केला आहे. सोबतच त्यांचे इतरही काही दुर्मिळ फोटो आहेत. चाहते या पोस्टवर भरभरून व्यक्त होताना दिसतात.
Check this post from @shraddhakapoor on Koo App:
“I will forever cherish the honour of having shared precious …”
https://www.kooapp.com/koo/shraddhakapoor/e843a46b-a152-4a4e-9843-cc9208170e60
Download Koo App
https://www.kooapp.com/dnld
Leave a Reply