
कोल्हापूर :शास्त्रीनगर क्रिकेट मैदानाची पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी केली .मैदानाच्या विकासासाठी आणखी दोन कोटी रुपये देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.कसबा बावडा आणि शास्त्रीनगर या दोन्ही मैदानाच्या उद्घाटन चांगल्या खेळाडूच्या उपस्थित केला जाईल असे त्यांनी यावेळी जाहीर केलं. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी विकेटची पहाणी ही केली.कबड्डी बास्केटबॉल टेबल टेनिस मलखांब बॅडमिंटन यासारख्या खेळांकरिता दहा कोटी रुपये खर्च करून शहरात इंडोर स्टेडियम उभारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं. देशातील अद्यावत फायरिंग रेंज विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी केली जात असून यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत शेंडा पार्क येथील जागेवर 25 कोटी रुपये खर्च करून जिल्हा क्रीडा संकुल उभारला जाणार आहे . तर शिवाजी स्टेडियम येथील रिकाम्या जागेतही इंडोअर स्टेडियम उभारलं जाणार आहे.यावेळी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर विद्यमान अध्यक्ष चेतन चौगुले उपाध्यक्ष रमेश हजारे केदार भैय्या वळ अभिजीत भोसले जनार्दन यादव संभाजी जाधव नंदू बामणे संजय पठारे किरण कोतकर काकासाहेब पाटील संजय मोहिते सुरेश ढोनुक्षे विनायक सूर्यवंशी यांच्यासह निवड चाचणीत सहभागी झालेले खेळाडू खेळाडू उपस्थित होते.
Leave a Reply