
कोल्हापूर:.करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे गोकुळचे दूध व दूग्धपदार्थ शॉपी उद्घाटन सोहळा संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालक बाळासाहेब खाडे यांच्या उपस्थित संपन्न झाला.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि ग्रामीण भागातील युवकांना गोकुळच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध आहे. व महाराष्ट्रातील मोठ्या शहरामध्ये गोकुळ दूध संघाच्या शॉपी च्या माध्येमातून गोकुळचे दूध व दूग्धपदार्थ उपलब्ध होत आहेत.त्याच प्रकारे आपल्या ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध झाली पाहिजेत. या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोकुळच्या शॉपी चालू केल्या जात आहेत.गोकुळ दूध,तूप,पनीर,दही,ताक,लस्सी,श्रीखंड सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. तसेच परिसरातील नागरिकांना उपलब्ध ठेवले आहे.यावेळी चेअरमन विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे,कृष्णात मोरे,विरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापूरे,भगवान लोंढे सर, कृष्णात लोंढे,आनंदा नाळे, गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील, संतोष पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a Reply