
कोल्हापूर: शेतीला रात्री ऐवजी दिवसा 10 तास वीज मिळावी, कृषी पंपांची वाढीव बिले कमी करावी, वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी 15 दिवस आधी कल्पना द्यावी आदी मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टीजी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलन स्थळी आज भेट दिली.शेतकरी हाच राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विजेच्या वापराबाबत शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. रात्रीच्या वीजपुरवठ्यावेळी प्राण्याचा हल्ला व अन्य धोके लक्षात घेता शेतीसाठी दिवसा १० तास वीज पुरवठा होणे गरजेचे आहे.त्याचप्रमणे सदोष बिले दुरुस्त करण्याची व वीज खंडित करण्याआधी पूर्वकल्पना देण्याची मागणीही योग्य असून या प्रश्नावर विधीमंडळामध्ये आम्ही लक्षवेधी मांडली होती. शुक्रवारी त्यावर चर्चा होणार होती, मात्र त्यादिवशी काही कारणाने पूर्ण कामकाज होऊ शकले नाही.त्यामुळे आता सोमवारी ही लक्षवेधी लावण्यात आली आहे. शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटले पाहिजेत ही लोकप्रतिनिधी म्हणून माझीही जबाबदारी आहे. त्यामुळे, हा प्रश्न अधिवेशनात नक्कीच ताकदीने मांडणार असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply