
कोल्हापूर:कसबा बावडा येथील लाईन बाजार हॉकी मैदानावरील २७ लाख रुपयांच्या फाईव्ह साईड ॲस्ट्रो टर्फचे उदघाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते व श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थित झाले.लाईन बाजार परिसराला हॉकीची अनेक वर्षांची परंपरा आहे. या भागातून अनेक गुणवंत खेळाडूं पुढे आले आहेत. या मैदानावर अनेक नावाजलेल्या खेळाडूंनी आपला खेळ आणि कौशल्य दाखविले आहे.कोल्हापूर व कसबा बावड्यातील क्रीडा परंपरेला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि त्याला साजेसे अत्याधुनिक मैदाने, साहित्य आणि अन्य सुविधा एकत्रीत उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव सातत्याने प्रयत्नशिल होते. क्रीडा विकासाला जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळावा यासाठी पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेब व आमदार ऋतुराज पाटील यांच्या सोबत आण्णां सातत्याने पाठपुरावा करीत होते.यावेळी माजी महापौर स्वाती यवलुजे, माधुरी लाड, अशोक जाधव, राजू लाटकर, विजय साळोखे (सरदार), सागर यवलूजे, संजय लाड, बाळासो माने, हर्षजित घाटगे, गजानन बेडेकर, योगेश निकम, निवास जाधव, ताहीर शेख, अमर भोसले, श्रीकांत चव्हाण, दिनेश मळेकर, मिलिंद वावरे तसेच जेष्ठ हॉकी खेळाडू यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply