
कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे, यासाठी शासन सकारात्मक आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमंत्री दीपांकर दत्ता यांना पत्र पाठविण्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री .उद्धव ठाकरे साहेब यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या काल पार पडलेल्या बैठकीत दिली होती. गेल्या ३८ वर्षापासून कोल्हापूर सह ६ जिल्ह्यातील वकील, पक्षकार, सामाजिक संघटनाच्या खंडपीठाच्या मागणीच्या लढ्यास मुख्यमंत्री यांनी बळ दिले असून, दिलेल्या शब्दानुसार त्यांनी कालच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमंत्री दीपांकर यांना तात्काळ पत्र पाठविले आहे. या मागणीस पाठबळ दिल्याबद्दल आणि शासनाच्या सकारात्मक भुमिकेबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आणि संपूर्ण राज्य मंत्री मंडळाचे आभार मानले आहेत. याबद्दल त्यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
Leave a Reply