
कोल्हापूर/प्रतिनिधी : आशा वर्कर्स तसेच रुग्णांना उपयुक्त पुस्तिकेचे स्त्री रोग संघटनेच्या वतीने नुकतेच प्रकाशन करण्यात आले. कोल्हापूरच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. समारंभाला उपायुक्त शिल्पा दरेकर, कोल्हापूर स्त्री रोगतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. निरुपमा सखदेव, उपाध्यक्ष डॉ.प्रसाद हलकर्णीकर, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.आशा जाधव तसेच कोल्हापूरमधील ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. ज्योत्स्ना भद्रे, पंचगंगा रुग्णालयाच्या डॉ. विद्या काळे ,सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या डॉ. रुचिका यादव ,डॉ.परशुराम कदम, डॉ. अरुणा चौगुले,स्त्री रोग संघटनेच्या सचिव डॉ. दिपाली पाटील
डॉ. अनघा कुलकर्णी ,डॉ.सुनिता अडनाईक, डॉ. इंद्रजीत जाधव, उपस्थित होत्या.सूत्रसंचालन
डॉ.समृद्धी इंगोले यांनी केले. डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आशा वर्कर आणि महानगरपालिका पालिकेतील डॉक्टरांच्या कामाबद्दल त्यांची प्रशंसा केली. तसेच कोल्हापूर येथील स्त्रीरोग संघटनेच्या सभासदांचे या पुस्तिके बद्दल अभिनंदन केले. पंचगंगा हॉस्पिटल,आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये
याच पुस्तिकेचे वाटप आशा वर्कर्सना करण्यात आले.
यावेळी डॉ. सुलभा कुलकर्णी,डाॅ. मंजुळा पिशवीकर, डाॅ.माया पत्की- सांगवडेकर,डाॅ. विद्या काळे,डॉ. निरुपमा सखदेव, डॉ.अंजली भागवत ,डॉ.किशोर केसरकर, डॉ. वाघ, डॉ.अर्पिता खैरमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.या पुस्तिकेत स्त्री आरोग्याच्या विविध विषयांवर विस्तृत चर्चा आहे.अतिशय सोप्या भाषेत ही पुस्तिका लिहीली असून आशा वर्करना त्यांच्या कामात नक्की मदत होईल असा विश्वास वाटतो.असे अध्यक्षा डॉ.निरुपमा सखदेव यांनी सांगितले.
Leave a Reply