उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दालन-२०२२चे होणार उद्घाटन

 

कोल्हापूर:बांधकाम क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा व घटकांची एकत्रित एकाच छताखाली माहिती मिळणारे एकमेव व्यासपीठ म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांचे दालन- 2022 हे प्रदर्शन दर तीन वर्षांनी भरवले जाते.क्रीडाईच्या वतीने हे प्रदर्शन यावर्षी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, संभाजीराजे छत्रपती, आमदार पी.एन पाटील, ऋतुराज पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या शुक्रवार दिनांक ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.प्रदर्शनात एकूण 160 संस्था सहभागी होणार आहेत. वन बीएचके पासून ते पेंटहाऊस, रो बंगला, सेकंड होम पर्यंतच्या सर्व गृह प्रकल्पांची माहिती या प्रदर्शनामध्ये मिळणार आहे. तसेच गृह उपयोगी साहित्याची देखील स्टॉल्सची रेलचेल असणार आहे. खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील असणार आहेत.तसेच कमी कागदपत्रात ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वित्तीय संस्था आणि बँकाचे स्टॉलही आहेत. या दालन प्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव प्रदीप भारमल, खजनिस गौतम परमार, दालनचे उपाध्यक्ष अजय डोईजड, सचिव सोमराज देशमुख, खजिनदार संदीप मिरजकर, श्रीधर कुलकर्णी, पवन जामदार, निखिल शहा, संदीप पवार, विक्रांत जाधव, संग्राम दळवी, संग्राम पाटील, रवी माने, गंधार डिग्रजकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!