महाटेक२०२२’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची २१ एप्रिल पासून सुरुवात

 

कोल्हापूर/प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या व्हिजनला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने  कोरोनाच्या दोन वर्षाच्या महामारी नंतर यंदा दिनांक २१ ते २४ एप्रिल २०२२ या कालावधीत पुण्याच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर अठराव्या महाटेक २०२२ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड च्या संचालिका गौरी मराठे यांनी दिली आहे. गौरी मराठी म्हणाल्या, महाटेक हे उद्योजकांसाठी आदर्श व्यासपीठ असून या प्रदर्शनात सातारा , सांगलीसह भारतातील आणि भरता बाहेरील २५० हुन अधिक कंपन्यांचा सहभाग आहे. हे प्रदर्शन पुण्यातील शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर  आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश हा विनामूल्य आहे. महाटेक हे प्रदर्शन अठरावे वर्ष असून जवळपास २५ हजार पेक्षा अधिक ग्राहक भेट देणार आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!