
दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेड (डीसीबीएल), ही दालमिया भारत लिमिटेडची भारतीय सिमेंट उद्योगातील अग्रेसर मुख्य उपकंपनी असून त्यांनी त्यांच्या सर्व ‘दालमिया सिमेंट’ ब्रँडसवर ग्राहक प्रस्ताव लॉन्च केले आहेत. महाराष्ट्रातील 2.9 दशलक्ष टन सिमेंट निर्मिती प्रकल्पाचे पुनरुज्जीवन, आधुनिकीकरण, विस्ताराकरिता रु 929 कोटींची गुंतवणूक करत आपल्या प्रादेशिक वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब केला आहे. सध्या कंपनी 2030 पर्यंत आरई100 च्या शाश्वत वचनबद्धतेचा प्रचार करते आहे. तसेच 2040 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचा मानस असून त्या अनुषंगाने ~10मेगावॅट वेस्ट हिट रिकव्हरी सिस्टीमची स्थापना आणि अत्याधुनिक ग्रीन फ्युएल युनिट बसविण्याची योजना आहे. ही गुंतवणूक अगोदरपासून राज्यभरात जवळपास ~1000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी मदत करते आहे. त्याचप्रमाणे कौशल्य निर्मिती, सामाजिक-आर्थिक विकास आणि पर्यावरण जबाबदारी व शाश्वतता वाढीकडे लक्ष देत आपले कर्तव्य बजावते आहे. श्रेणीनिहा विस्तृत विक्रेते आणि सह-विक्रेत्यांच्या नेटवर्कला भांडवल साह्य करण्याची कंपनीची योजना आहे. त्यांचे भारताच्या दक्षिण आणि पश्चिम राज्यांत जवळपास 11,000+ चे बळकट नेटवर्क आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश प्रदेशासह महाराष्ट्र ही सिमेंटची मोठी बाजारपेठ असून ही मागणी पुरेशा प्रमाणात पूर्ण करण्याची खातरजमा त्यांच्करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात आपल्या गुंतवणुकीच्या आधारे राष्ट्र बांधणीच्या कंपनीच्या वचनबद्धतेवर बोलताना डीसीबीएलचे वरिष्ठ कार्यकारी संचालक संजय वाली म्हणाले, “राज्याच्या औद्योगिक आणि पायाभूत विकास प्रगतीत सक्रिय भूमिका निभावण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो. आम्ही राज्यात गुंतवणूक करून त्यांच्या आर्थिक विकासगाथेत सामील होत आमची गुंतवणूक आणि सामाजिक परिवर्तनाच्या उपक्रमामार्फत रोजगार निर्मिती करण्याबाबत आत्मविश्वास बाळगून आहोत. ज्यामुळे आगामी काळात प्रगतीशील तसेच स्वयंशाश्वत परिसंस्थेला चालना मिळेल.”दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेडच्या वतीने पश्चिम क्षेत्रातील त्यांच्या वाढत्या ग्राहकांसाठी आकर्षक प्रस्ताव सादर केले आहेत. महाराष्ट्रातील ग्राहक ‘घरी आनंद साजरा करा तेही घर बनविण्याचे अगोदर’ या विशेष संधीचा लाभ घेऊ शकतील. हा पर्याय ‘दालमिया सिमेंट’च्या सर्व मजबूती, टिकाऊपणा आणि पर्यावरण-स्नेही रिटेल ब्रँडवर उपलब्ध आहे. “आमचे भारताच्या पश्चिमेकडील विवेकी ग्राहक त्यांच्या बांधकामाच्या व्यावसायिक अथवा वैयक्तिक आवश्यकतांनुसार बांधकाम पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे केवळ मूलभूत बळकटीची खातरजमा राहत नाही तर आगामी काळातील पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरणाला मदत मिळते,”असे डीसीबीएल, दक्षिण, प्रादेशिक संचालक, सुनील अगरवाल म्हणाले. “त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव आमच्या स्वतंत्र होम बिल्डर्सकरिता सादर करत आहोत, त्यांनी आमच्या प्रस्तावांत जो विश्वास दाखवला आणि आमचे प्रादेशिक अस्तित्व बळकट होण्यासाठी साह केले, हे त्याचे बक्षीस आहे.”
Leave a Reply