
कोल्हापूर/प्रतिनिधी: आज कोल्हापूर येथे महा होम मिनिस्टर या झी मराठी वाहिनीवरील स्पर्धेच्या ऑडिशन्स कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक भवन मार्केट यार्ड येथे संपन्न झाल्या यावेळी हजारो महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला 11 लाखाची पैठणी कोण जिंकणार याचे उत्सुकता लागली आज लागली असून महिलांची स्पर्धा आणि कोण जिंकणार पैठणी याची चर्चा आज कोल्हापूर केंद्रावर पहावयास मिळाली.यावेळी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले की हा कार्यक्रम ॲक्शन रिएक्शन चा आहे घर सांभाळणारी भगिनींना बोलतं करायचं असतं आणि तिला तिचा सन्मान मिळवून द्यायचा असतो हाय कौटुंबिक कार्यक्रम आहे गेली अठरा वर्ष हजारो किलोमीटर प्रवास करून मी माझ्या भगिनींच्या चेहऱ्यावरती हसु आणू शकलो याचे मला समाधान आहे आज सकाळी महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन कोल्हापूर केंद्रावरच महा मिनिस्टर चे निवडप्रक्रिया सुरू केली जवळपास अडीच हजारांहून अधिक भगिनींनी यात भाग घेतला आहे त्यातून 90 भगिनींचे निवड होणार असून पुढील फेरी करिता या 90 भगिनी मुंबईला जाणार आहेत झी मराठी सातत्याने होम मिनिस्टर च्या माध्यमातून महिलांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करत आहे याचा सार्थ अभिमान मला आहे या भगिनींची बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर ती असणारे हसू समाधान देऊन जातं असे मत आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले
Leave a Reply