
नानीबाई चिखली:देवावरील श्रध्देपोटी लोकांमधील एकोप्याची भावना वाढीस लागून समाज एकसंध बनतो. या उदात्त हेतुनेच आपण हजार कोटींचा निधी देवून गावा-गावात ६००हून अधिक मंदिरांचा जिर्णोद्धार केला असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
नानीबाई चिखली (ता.कागल) येथील १२ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कागल मतदारसंघात झालेला विकास नेत्रदीपक आहे. याबरोबरच सामान्य माणसाच्या आरोग्य सेवा, गरजूंना पेंन्शन योजना, बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना यासह अनेक वैयक्तिक लाभाचीही कामे मार्गी लावली आहेत. गरीब महिलांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने दरमहा एक रुपयात दहा नँपकिन देणार आहोत, याचाही महिलांनी लाभ घ्यावा.
निराधार समितीचे सदस्य सदाशिव तुकान यांनी स्वागत केले. बिद्रीचे संचालक प्रविणसिंह भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी अरुणराव भोसले, ए. वाय. पाटील-म्हाकवेकर, के. के. पाटील, सरपंच छाया चव्हाण, उपसरपंच विजय घस्ती, श्रीशैल नुल्ले, मयूर आवळेकर, डी. पी. पाटील आदी उपस्थित होते. बसीर नदाफ यांनी आभार मानले.
Leave a Reply