
कोल्हापूर / प्रतिनिधी: 31 मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस असतो. या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची शाखा कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सेवा रुग्णालय,सीपीआर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल,डी. वाय. पाटीलमधील एकूण ३७ परिचारिका व नर्सिंग स्टाफने व डॉक्टर यांनी यात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत निकिता साळुंखे यांचा प्रथम क्रमांक, मंथन पाटील यांचा द्वितीय तर सोनाली बिचर व प्रणव शिंदे यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. तंबाखू सेवनाने भारतात दहा लाख लोक विविध आजाराने मृत्यू पावतात. यामध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. हृदयरोग, कर्करोग, मोतिबिंदू, टीव्ही, पक्षाघात, व्यंग या प्राणघातक आजारांना लोकांना बळी पडावे लागते. शालेय मुलांमध्ये ही चिंतेची बाब आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग यात असणे आवश्यक आहे, असे सागर वासुदेवन आणि तज्ञ डॉ. रूपाली दळवी यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात सांगितले. सागर वसुदेवन यांनी आतापर्यंत एक हजार रुग्णांना व्यसनमुक्त केले आहे.कार्यक्रमाचे नियोजन डॉ. प्रवीण नाईक यांनी केले.पारितोषिक वितरण डॉ. किरण दोशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी असोसिएशनचे अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई,सचिव डॉ.ए. बी.पाटील, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. शितल पाटील,डॉ. नीता नरके,डॉ.आशुतोष देशपांडे, डॉ.अश्विनी पाटील,डॉ.आबासाहेब शिर्के आदी उपस्थित होते
Leave a Reply