
कोल्हापूर / प्रतिनिधी :सामाजिक बांधिलकी जपणार्या जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीचा शपथविधी व पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला.यावेळी नूतन आमदार जयश्री जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या “दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव- आण्णा यांचे आणि जायंट्स ग्रुपचे नाते जिव्हाळ्याचे होते. समाजाला मदतीचा हात देणाऱ्या या संस्थेला त्यांनी नेहमीच मदत केली आहे. लोकांच्या गरजांना नेहमीच धावून जायची त्यांची प्रवृत्ती होती. यावेळी मावळत्या अध्यक्षा सौ. शुभदा कामत यांनी नूतन आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. नूतन अध्यक्ष राजाराम मटकर यांनी पदभार स्विकारला. यावेळी विधवा प्रथा बंदीचा ठराव करण्यात आला. माजी अध्यक्षा सौ.शुभदा कामत यांची पास्ट प्रेसिडेंट फोरमच्या प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. शारदा शेट्टी यांची युनिट ऑफिसरपदी नियुक्ती झाली. त्यावेळी प्रसार माध्यमातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. शपथविधी युनिट डायरेक्टर सुरेश खांडेकर यांनी नूतन सदस्य व कार्यकारिणीला शपथ दिली. यावेळी प्रमोद शहा मामा, डॉ.सतीश बापट, ऍड.विलासराव पवार, डॉ. राजकुमार पोळ, रामदास रेवणकर मंदाकिनी साखरे, बबीता जाधव, दिलीप जाधव, सुनंदा मोरे, शुभांगी तावरे, अक्षय थोरवत, सुरेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिता काळे आणि विजय विभूते यांनी केले. तर आभार सौ. कांचन समुद्रे यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply