
कोल्हापूर: नियमित सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल चालविण्याने मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. विविध आजार दूर पळतात. तेव्हा शरीर तंदुरुस्त आणि आपल्या जीवनातील आरोग्यविषयक समस्या कमी करण्यासाठी नियमितपणे सायकल चालवणे हाच चांगला पर्याय आहे. सायकल चालवा आणि जीवनात निरोगी-आनंदी राहा’अशा शब्दांत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी तंदुरुस्त जीवनासाठी टिप्स दिल्या. निमित्त होते, ‘तीन जून, जागतिक सायकल दिनाचे !’. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) प्रायोजित व कोल्हापूर सायकल क्लब यांच्यावतीने शुक्रवारी ३ जून कोल्हापुरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते.
Leave a Reply