
मुंबई : फ्रीडम अॅपने (IndianMoney.com चा भाग) भारतीय शेतकरी, लघु-उद्योजक आणि गृहिणींच्या न ऐकण्यात आलेल्या यशस्वी गाथांना प्रशंसित करण्यासाठी एनडीटीव्ही नेटवर्कसोबत सहयोगाने अद्वितीय शो ‘आयकॉन्स ऑफ भारत‘ लॉन्च केला आहे. या व्यक्तींनी कदाचित सामान्य जीवन जगले असेल, पण त्यांच्या कौशल्यांना लाभदायी कृषी व व्यवसाय उद्यमांमध्ये बदलत असामान्य जीवन देखील जगले आहे.आयकॉन्स ऑफ भारत (Icons of Bharat) ही टेलिव्हिजन सिरीज आहे, जी सर्वोत्तम भारत निर्माण करण्याप्रती कटिबद्ध असलेल्या व्यक्तींच्या वास्तविक कथांना प्रशंसित करेल. आम्ही उद्योजक व शेतकऱ्यांना सन्मानित करतो, ज्यांनी सर्व विषमतांवर मात करत आणि लघु व्यवसाय, त्यांच्या शेतीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या घरांमधून स्वत:चा उदरनिर्वाह विकसित करत आर्थिक यश संपादित केले आहे. १४ एपिसोड्सची ही सिरीज ५ जून २०२२ पासून दर रविववारी रात्री ९.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत एनडीटीव्ही इंडियावर प्रसारित होईल आणि एपिसोडचे पुनर्प्रसारण त्यानंतर येणाऱ्या शनिवारी रात्री ९.३० वाजता पाहता येईल.आपण भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना एनडीटीव्ही इंडियाचा ‘आयकॉन्स ऑफ भारत‘ला स्वप्न पाहण्याचे धाडस केलेल्या व्यक्तींचे असाधारण धैर्य व प्रेरणेला प्रशंसित करणारा व्यासपीठ बनवण्याचा मनसुबा आहे.ज्या लोकांनी त्यांच्या क्षेत्रात यश संपादन केले आहे अशा निवडक विख्यात लोकांच्या यशोगाथा दाखवून लाखो भारतीयांना आयकॉन्स ऑफ भारत प्रेरणा देऊ इच्छिते. आमचे आयकॉन्स कृषी, होम बेकिंग, कँडल-मेंकिंग, चॉकलेट-मेकिंग, रिअल इस्टेट एजंट्स अशा विभिन्न क्षेत्रांमधील आहेत. या शोचा भारतीयांना माहिती देण्याचा मनसुबा आहे की कौशल्य संपादित करण्यासाठी पात्रता किंवा मोठ्या पदवीची गरज नाही, तर शिकण्याचे व कोणत्याही पूर्वग्रही विचारांना झुगारण्याचे मोठे स्वप्न महत्त्वाचे आहे. श्री. सी एस सुधीर यांनी सुरू केलेल्या फ्रीडम अॅप सारख्या व्यासपीठांच्या माध्यमातून पसंतीचे कौशल्य आत्मसात करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे आणि त्यासाठी आता फक्त व्यवसाय निर्माण करत जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची जिद्द पाहिजे. भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे आणि हे यश प्रत्येक उद्योजक आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे, ज्यांनी अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी योगदान दिले. तथापि, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अशाप्रकारे ‘आयकॉन्स ऑफ भारत’ ही कल्पना आम्हास सुचली कारण आम्हाला विश्वास आहे की हे ते लोक आहेत ज्यांची प्रशंसा व्हायला हवी. आणि देशाच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांवर प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे”, असे विचार IndianMoney.com चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सी एस सुधीर यांनी व्यक्त केले.
Leave a Reply