
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 73 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, आर्किटेक्ट सचिन घाटगे, अशोक रेंगडे, वकील चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. रक्तदान शिबिराचे हे तिसरे वर्ष असल्याचे आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, संतोष घाटगे, अमरजा पाटील, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, विशाल वठारे, आदम शेख, प्रथमेश सूर्यवंशी, सुरेखा पाटील, लता गायकवाड, विजय हेगडे, किशोर खाडे, मयूर भोसले, अभिजित कांबळे, दत्तात्रय बोनगाळे, रवींद्र राऊत, डॉ. कुमाजी पाटील, सचिन वणीरे, लाला बिरजे, बाबुराव बाजारी, प्रकाश हरणे, मंगेश मोहिते, कृष्णात सूर्यवंशी, संजय नलावडे, राहुल पाटोळे, दिग्विजय चिले, गणेश वडर राकेश व्हटकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply