
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक जाण ठेवून सर्वसामान्य जनतेच्या, निसर्गाच्या, आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच संपन्न होत आलेला आहे. यावर्षीचाही वाढदिवस सामाजीक उपक्रम म्हणून वृत्तपत्र विक्रेते, रिक्षा चालक, दुध विक्रेते (घरो घरी जाऊन दुध देणारे) यांना रेनकोट तर घरेलू कामगार महिलांना छत्री देऊन साजरा होणार आहे.
यापूर्वी केलेल्या वाढदिवसामध्ये रद्दीच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारून ती रद्दी व आपल्याकडील मदत देवून स्वयंसिद्धा संस्थेस प्रोजेक्ट प्रदान करण्यात आला. जीवनरक्षक दिनकर कांबळे यांचा विमा उतरवण्यात आला. रोपांच्या माध्यातून शुभेच्छा स्वीकारून, शहरात जवळपास ३५ हजार रोपे केएसबीसीच्या माध्यमातून लावून शहराचे सौदर्य खुलवून पर्यावरण रक्षणाचा संदेश ही दिला. खतांच्या स्वरूपात शुभेच्छा स्विकारून जिल्ह्यातील ५० हजार शेतक-यांना युरीया या दाणेदार खताचे नियोजनपूर्ण वितरण करण्यात आले. वयोवृद्ध लोकांची सेवा करणारे सावली केअर सेंटर उभारणीसाठी मदत अशा नाविन्यपूर्ण कामातून संकल्प बांधून वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यम उपक्रमाच्या माध्यमातून ताप मोजण्यासाठी लागणारे थर्मामीटर, थर्मल मशीन, मोठया सोसायटी व अपार्टमेंट ठिकणी सॅनिटायझर स्टँड देण्यात आले. मागील वर्षी कणेरी मठ येथे ४० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले. त्याचबरोबर वाढदिवसाच्या निमित्याने कणेरी मठ येथे मोठ्या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली.
गेल्या दोन वर्षातील जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता समाजामध्ये तीनही ऋतुंमध्ये काम करणाऱ्या घटकांची सामाजिक जाण म्हणून तसेच जे आपले जगणे सुखाचे बनवतात त्यांची काळजी म्हणून यावर्षीचा भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस वृत्तपत्र विक्रेते, रिक्षा चालक, दुध विक्रेते (घरो घरी जाऊन दुध देणारे) यांना रेनकोट तर घरेलू कामगार महिलांना छत्री देऊन साजरा होणार आहे.या उपक्रमात आपला लोक सहभाग नोंदवण्यासाठी ‘संवेदना सोशल फौंडेशन’ या नावे चेक अथवा रोख रक्कम देऊन शुभेच्छारुपी सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply