शाहू छत्रपती फॉउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

 

कोल्हापूर: कोल्हापुरच्या शाहू छत्रपती फॉउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तानाजी शंकर कांबळे यांच्यासह वीस शिक्षकांच्या नावांची घोषणा र्फोंङेशनचे अध्यक्ष जाॅर्ज क्रूझ यांनी पत्रकार परिषदेत केली.या पुरस्कार विजेत्यामध्ये पंधरा शिक्षकाना राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.उर्वरित पाच विजेत्याना राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्काराने गौरवले जाणार आहे.दोन जुलै रोजी सायंकाळी साडे चार वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन बहुउद्देशीय सभागृहात युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. जॉर्ज क्रुझ आणि सचिव जावेद मुल्ला यानी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. या पुरस्काराचे स्वरूप  मानपत्र, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि कोल्हापुरी फेटा असे आहे.या पत्रकार बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी तानाजी शंकर कांबळे (कल्लेश्वर हायस्कूल,कसबा बीड),दीपक मधुकर शेटे (आदर्श विद्यानिकेतन ,मिणचे, ता. हातकणगले),सौ. सुस्मिता राजकुमार शिंदे( नरंदे हायस्कूल, नरंदे), विकास यशवंत समुद्रे (के पी सी हायस्कूल,बोरपाडले), दत्तात्रय दादू पाटील (विद्यामंदिर नागाव ,ता.करवीर), पूनम बाळासाहेब भोपले(विद्यामंदिर यादववाड़ी,ता.करवीर), उस्मान हबीब मुकादम( मौलाना आझाद उर्दू हायस्कूल,कोल्हापुर), माधुरी अनिल मातले( महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी), प्रमोद गणपतराव कांबळे( दि न्यू हायस्कूल यड्राव,ता.शिरोळ), बाजीराव पांडुरंग पाटील ,विद्यामंदिर सरवड़े, ता. राधानगरी), रमेश पांडुरंग वारके(बोरवड़े विद्यामंदिर बोरवड़े, ता. कागल), सुजाता रविन्द्र देसाई(गुरूदेव विद्यानिकेतन), राजेन्द्र हिंदूराव तौंदकर ( विद्यामंदिर वाकरे, ता. करवीर),बाळासाहेब बळीराम पाटील( वारणा विद्यानिकेतन,,नवे पारगाव ,ता. हातकनंगले),साताप्पा दत्तात्रय कासार (श्रीराम विद्यालय, राजारामपुरी), यांचा समावेश आहे.राज्यात पहिल्यांदा विधवा बंदीचा ठराव करणाऱ्या ग्रामपंचायत हेरवाडसह प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्राचे निवृत्त अधिकारी डॉ जे पी पाटील, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ प्रमोद शहाजी पांडव,कड़गाव(ता.भुदरगड येथील वजीर गफूर मकानदार, आणि डॉ संजय चोपड़े याना राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. जॉर्ज क्रुझ यानी यावेळी बोलताना दिली.या पत्रकार बैठकीस फाउंडेशनचे संचालक नवाब शेख, डॉ बी के कांबळे, दीपक बिडकर, निसार मुजावर, महेश धींग, चंद्रकांत कांडेकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!