
कोल्हापूर: सारथीच्या अल्प काळातील कामांचे कौतुक करून महाराष्ट्र शासनाच्या योजना तसेच सारथी मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेवून नवउद्योजकांनी कौशल्यपूर्ण व्यवसायावर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी यावेळी केले.छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) उपकेंद्र कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र यांचेमार्फत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज छ. ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Leave a Reply