
कोल्हापूर,: खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली व व ते खासदारही प्रचंड मताने निवडून आले. मंडलिक व माने गटाव्यतिरिक्त शिवसेना व प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणारे अनेक व्यक्तींनी या विजयामध्ये हातभार लावला होता.या दोघांनी शिंदे गटाकडे जाताना मात्र केवळ त्यांच्या गटातील लोकांचा विचार विनिमय करून शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे, ही बाब अत्यंत निषेधार्य आहे. त्यांना मदत करणाऱ्या सर्वच घटकांना एकत्रित करून त्यांनी विचार विनिमय करून हा निर्णय घेतला असता तर त्यांचा प्रामाणिकपणा मतदारांच्या पुढे लक्षात आला असता. पण त्यांनी असे केले नाही. ही बाब मतदारांना व निष्ठावंत शिवसैनिकांना कधीही पसंत पडणार नाही.
आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट होईल. व आम्ही ताकतीने आगामी लोकसभा निवडणूक लढवू व जिंकून दाखवू, हे आज शिवसेनेचे प्रामाणिक कार्यकर्ते व मतदार यांचे मत आहे.शिवसेना शहर प्रमुख सुनिल मोदी आणि शिवसेना समन्वयक हर्षल सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तसेच खासदार संजय मंडलिक यांच्या कोट्यातून माझी (सुनिल मोदी) पुणे रेल्वे बोर्डावर नियुक्ती करण्यात आली होती. खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात गेल्यामुळे या निर्णयाच्या निषेधार्थ म्हणून मी पुणे रेल्वे बोर्डाचा राजीनामा आज रोजी दिला आहे. तसेच शहरातली शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक प्रयत्नशील आहोत. असेही सुनिल मोदी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित रवी चौगुले , राजु पाटील ,अवधूत साळोखे , कमलाकर जगदाळे ,मंजित माने,विशाल देवकुळे उपस्थित होते.
Leave a Reply