
बाचणी/ प्रतिनिधी: शैक्षणिकदृष्ट्या आदर्श कागल घडविण्यासाठी शाळांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. अशी ग्वाही राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी दिली .राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांत ई- लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाअंतर्गत बाचणी ता. कागल येथील प्राथमिक शाळेतील ई-लर्निंग सुविधा लोकार्पणवेळी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याचे माजी संचालक आर. के.पाटील होते.यावेळी सौ.घाटगे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.त्या पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागात अपुऱ्या शैक्षणिक सुविधां असतानाही येथील शिक्षक त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मेहनत करतात .त्यामुळे कागल तालुक्याचा शैक्षणिक स्तर उंचावला आहे . कागल शैक्षणिकदृष्ट्या अग्रस्थानी येण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शाळा यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. राजे फाउंडेशनच्या या ई-लर्निंग सुविधेमुळे जागतिक पातळीवरील शैक्षणिक क्षेत्रातील अद्यावत घडामोडी शाळेतील विद्यार्थ्यांना अनुभवता येतील.असेही त्या म्हणाल्या.यावेळी शाहूचे संचालक सचिन मगदूम,रमेश पाटील,माजी पोलीस पाटील बाजीराव पाटील, मेहबूब शाणेदिवाण, भगवान डांगे, निवृत्ती पाटील, सुभाष जाधव, किसन सोडलकर, बाळासो खामकर, आनंदा ब.पाटील, जी डी पाटील, उत्तम चौगुले, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.स्वागत मुख्याध्यापक आयलू देसा यांनी केले.प्रास्तविक उत्तम पाटील यांनी केले.आभार जयवंत पाटील यांनी मानले
Leave a Reply