
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) व एनडीडीबी व सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशन (टाटा ट्रस्ट) यांच्या सहकार्याने स्लरीपासून ५ टन क्षमतेचा राज्यातील पहिल्या सेंद्रिय खत प्रकल्पाचे भूमिपूजन मा. हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.गोकुळ दूध संघाने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी गोकुळच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन योजना राबविण्याचे धोरण अमलात आणलेसध्या स्लरी तयार कारण्यासाठी १२० बायोगॅस प्लांट प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार असून भविष्यामध्ये याची व्याप्ती वाढविण्याचा मानस आहे. &९२ लाख ६५ हजारांच्या अर्थसाहाय्यातून होणारा आणि ५ टन सेंद्रिय खत& तयार करण्याचा हा प्रकल्प निश्चितच वेगळेपण जपणारा आहे.हे प्रकल्प चुये, बाचणी, इस्पुर्ली, खेबवडे, वडकशिवाले, निगवे खालसा या गावातील महिला उत्पादकांना देण्यात येणार& आहे. ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये ४ ते ५ जनावरे असतील त्यांना या प्रकल्पाच्या माध्य्मातून उभारण्यात येणाऱ्या बायोगॅस प्लांट मधून घराच्या घरी गॅस उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर, या प्लांट मधील स्लरी हे शेतकरी गोकुळ दूध संघाला विकणार आहेत. या दोन्ही माध्यमातून महिन्याला साधनारपणे साडेतीन हजार रुपयांचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे. या स्लरी प्रकल्पातून सेंद्रिय खत, फवारणी खत, तयार करून गोकुळाला हि त्याचा आर्थिक फायदा नक्की होईल.गोकुळचे शिल्पकार स्व. आनंदराव पाटील चुयेकर साहेब यांनी जिल्ह्यामध्ये गोकुळच्या माध्यमातून धवल क्रांती करत ग्रामीण भागातील जीवन समृद्ध बनविले आहे. स्वर्गीय चुयेकर साहेबांच्या विचारांवर गोकुळचे वाटचाल सुरु असून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व सर्व संचालक मंडळ करत आहेत.
Leave a Reply