
कोल्हापूर : कोल्हापूरचे नाव उंचीवर नेण्यासाठी कार्यरत असणाऱ्या उद्योजकांना सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट च्यावतीने कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते यावर्षी या पुरस्काराचे सहावे पर्व असून यावर्षीचा पुरस्कार मयुरा स्टीलचे चेअरमन चंद्रशेखर डोली यांना जाहीर केला असल्याची माहिती सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे कोल्हापूर विभाग प्रमुख विशाल मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, बुधवारी (ता.२४) रोजी दुपारी चार वाजता रेसिडेन्सी क्लब येथे हा कार्यक्रम होणार असून हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी अणूशास्त्रज्ञ, ज्येष्ठ उद्योजक,सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. सुरेश हावरे उपस्थितीत राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर अजित मराठे असणार आहेत. तर डेप्युटी सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. क्लबच्या वतीने हा पुरस्कार गेली सहा वर्षे सातत्याने आम्ही हा पुरस्कार देत आहे. मयुरा स्टीलच्या माध्यमातून काम करत असताना श्री. चंद्रशेखर डोली यांनी कोल्हापूरला आर्थिक, सामाजिक क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. उपविभाग प्रमुख निलेश पाटील यांनी सांगितले की या पुरस्काराची निवड कोल्हापूरातील विविध अकरा संघटनेतून एक निवड समिती करत असते याचा आम्हाला अभिमान आहे. कोल्हापूर चॅप्टरचे चेअरमन पिराजी पाटील यांनी हा पुरस्कार सोहळयामध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असल्याचे सांगितले तसेच याचे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या फेसबुक पेजवरून थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी सचिव सिद्धेश मोहिते, खजानीस पूनम शहा, दिपा देशपांडे, इंद्रनील बंकापुरे आदी उपस्थित होते.
Leave a Reply