कोल्हापुरकरांना मिळणार अद्ययावत श्रवणक्षमता ; मुंबई हिअरिंग क्लिनिकसोबत कोल्हापूरचे पहिले बेस्ट साउंड सेंटर सुरू

 

कोल्हापूर /प्रतिनिधी : श्रवणयंत्र क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सिग्नियाने कोल्हापुरकरांसाठी आरोग्य क्षेत्रातील मोठी घोषणा केली. मुंबई हिअरिंग क्लिनिकसह कोल्हापुरात १५७०/ ई , देसाई कॉम्प्लेक्स शॉप नंबर १, लेन नं ३, राजारामपुरी, कोल्हापूर, ४१६००८ येथे विशेष केंद्र सुरू करण्यात आल्याचे आज सिग्नियातर्फे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
मुंबई हिअरिंग क्लिनिक चे कोल्हापूर येथील पहिले बेस्ट साउंड सेंटरचे उद्घाटन शिवांतोस इंडिया प्रा. लि.चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अविनाश पवार, सिग्नियाचे व्यवसाय विकास प्रमुख किशलय चक्रवर्ती आणि शिवसेनाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.जागतिक आरोग्य संस्थेच्या (डब्ल्यूएचओ) अंदाजानुसार, अंदाजे ६३ दशलक्ष नागरिक सिग्निफिकंटने त्रस्त आहेत. कमी ऐकू येणे किंवा ऐकू न येणे ही भारतीयांपुढे देखील मोठ्या समस्या आहे. देशातील लोकसंख्येमध्ये त्याचे प्रमाण अंदाजे ६. ३ टक्के आहे.कमी ऐकू येण्याची समस्या कोणत्याही वयात कोणालाही उद्भवू शकते. त्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास अनेकदा शारीरिक आणि सामाजिक बिघाड निर्माण झाल्याचे देखील समोर आले आहे.शिवांतोस इंडिया प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अविनाश पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, शिवांतोस इंडिया कोल्हापुरातील नागरिकांसाठी उत्तम ध्वनी गुणवत्ता असलेले श्रवणयंत्र आणि कनेक्टिव्हिटीमध्ये क्वांटम लीप सादर करण्यास उत्सुक आहे. या अद्ययावत श्रवणयंत्रा्द्वारे वापरकर्त्यांचा ऐकण्याचा अनुभव आणखी सुधारेल. नागरिकांची श्रवणशक्ती वाढविण्यासाठी आम्ही सतत नवीन तांत्रिक उपाय शोधत आहोत.नवीन सेंटरबाबत मुंबई हिअरिंग क्लिनिकचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत जाधव म्हणाले की कोल्हापूरकरांची सेवा करणे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानातील अत्याधुनिक गोष्टी देणे हे या नवीन स्टोअरच्या माध्यमातून शक्य होणार आहे. ६५ किंवा त्याहून अधिक वयाच्या १/३ किंवा अधिक प्रौढांना काही प्रमाणात वयाशी संबंधित श्रवणशक्ती कमी होते. सिग्नियामधील टीमसोबत आम्ही एक संपूर्ण निदान सेटअप आणि अत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र स्वस्त दरात देऊ. जे लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना पुन्हा जीवनाशी जोडण्यास मदत करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!