
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची हीरक महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संपूर्ण गोकुळची उलाढाल विस्तृतपणे सांगितली. त्यांचे भाषण चालू असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रश्नांची उत्तरे का देता येत नाहीत असा सवाल केला. परंतु त्याचवेळी सर्व ठराव मोठ्या आवाजात मंजूर करण्यात आले. विरोधकांची संख्या कमी असल्याने त्यांचा आवाज पोहोचू शकला नाही. शेवटी विरोधकांनी सभागृह सोडून बाहेर घोषणा देण्यास सुरुवात केली. गोकुळ मध्ये 25 ते 30 वर्षांनी सत्तांतर झाले परंतु गोंधळाची परंपरा कायम राहिली. सत्यजित कदम यांनी देखील प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. खासदार धनंजय महाडिक यांनी सभेस येण्याचे टाळले तसेच बंटी पाटील व हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वसाधारण सभेत गोकुळचे संपूर्ण संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply