दररोज लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी बजाजने दाखल केली ‘CT125X’ बाईक

 

खराब रस्त्यांवर दिवसभर गाडी चालवणाऱ्या आणि ज्यांना कामगिरी व टिकाऊपणा हवा असतो अशांसाठी तयार झालेली बाईक.शक्तिशाली अशा 125cc इंजिनसह येणाऱ्या या बाईकला मागे सामानासाठी कॅरीयर आणि युएसबी चार्जिंगसुद्धा आहे. त्याशिवाय तिला थीकर क्रॅश गार्ड, ट्युबलेस टायर असून क्विल्टेड सीट आहे.CT125X ड्रमची ७१,४८२ रुपये आणि CT125X डिस्कची ७४,६८२ रुपये या किमतीला उपलब्ध असलेली ही बाईक तीन रंगांच्या मिलाफी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – ब्ल्यू डेकल्स एबोनी ब्लॅक, ग्रीन डेकल्ससह एबोनी ब्लॅक, रेड डेकल्ससह एबोनी ब्लॅक.

पुणे: जगातील दुचाकी आणि तिचाकीच्या क्षेत्रातील सर्वात मूल्यवान कंपनी ‘बजाज ऑटो’ने ‘CT125X’ बाईक दाखल करत असल्याचे जाहीर केले आहे. हे नवीन उत्पादन ‘हर सडक पर कडक’ या तत्त्वाला अनुसरून साकारले गेले असून ही दुचाकी दरदिवशीची लांब पल्ल्याची सवारी आणि आव्हानात्मक चलन अनुभवाच्या दृष्टीने बनविण्यात आली आहे.बजाज ऑटोच्या ‘CT125X’मध्ये अनेक वैशिष्ट्ये असून ही बाईक टिकाऊ आहे. ज्या बाईकस्वारांना संपूर्ण दिवस ती चालवायची असते आणि काहीवेळा फूड डिलिव्हरी, कुरियरसेवा किंवा व्यापार वितरणासारख्या व्यवसायात त्यावरून सामान न्यायचे असते त्यांच्यासाठी ही आदर्शवत बाईक आहे. या दुचाकीस्वारांना काहीवेळा आव्हानात्मक वातावरणात आणि वाईट रस्त्यांवर दुचाकी चालवावी लागते. अशावेळी त्यांना भोरोसेदायी आणि दणकट गाडी लागते. ही गाडी अद्वितीय अशी कामगिरी देते, ती दणकट पद्धतीने बनली आहे आणि दिसायला शैलीदार आहे.बजाज ऑटोच्या मोटरसायकल विभागाचे अध्यक्ष श्री सारंग कानडे यावेळी बोलताना म्हणाले, “CT125X दाखल करून आम्ही एक वेगळे उत्पादन ग्राहकांना देत आहोत. ही बाईक उत्तम कामगिरी आणि अतुलनीय टिकाऊपणासह उत्तम मुल्य मिळवून देते. नवीन ‘CT125X’ची किंमत अत्यंत किफायतशीर असून ती रस्त्यांवर आव्हानात्मक परिस्थितीसाठी आणि लांबपल्ल्याच्या सफारीसाठी सुयोग्य अशीच आहे. ती डिस्क आणि ड्रम या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.”CT125X ड्रमची किंमत ७१,४८२ रुपये आणि CT125X डिस्कची ७४,६८२ रुपये असून ही बाईक 125cc DTS-i इंजिन पाठबळासह येते. ती 8000 rpm ला 10.9 Ps पॉवरसह उपलब्ध असून तिचे टॉर्क हे 5500 rpm ला 11 Nm एवढे आहे. त्याद्वारे ती कडक कामगिरी करते. तिचा चाकांचा पाया हा 1285 mm असून त्यामुळे खराब आणि ओबडधोबड रस्त्यांवरसुद्धा तिला चांगले स्थैर्य प्राप्त होते. इंजिनचे संरक्षण करणारे फुगीर पॅन आणि ट्यूबलेस टायर यांच्यामुळे तिला कडक टिकाऊपणा प्राप्त होतो. त्याशिवाय, बाईकच्या कडक आरामदायी पणामध्ये जाडसर पॅड असलेले आसन, अधिकचे समान वाहून नेयासाठी कॅरीयर, डिस्क ब्रेक आणि SNS सस्पेन्शन यांचे योगदान आहे. तर कडक डिझाइन ही पिळदार लुक, काळा भाता आणि रबराचे टँक पॅड या गोष्टींमुळे प्राप्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!