रुपनगर के चीते 16 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

 

कोल्हापूर: काही गोष्टींचा मोल करता येत नाही. त्यापैकी एक म्हणजे मैत्री. मैत्री ही जीवाला जीव लावणारी असते. ती कधी हसवून जाते तर कधी अश्रू देऊन जाते. अशीच मित्रांमधील दोस्तीची कथा सांगणारा ‘रूप नगर के चिते’ हा मराठी चित्रपट 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. अखिल आणि गिरीश या दोन जिवलग मित्रांच्या आयुष्यात अशा घटना घडतात की त्यामुळे त्यांच्या दुरावा निर्माण होतो. त्यांच्यातील हा दुरावा वाढणार की मिटणार याची उत्सुकता असणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटांमध्ये मुग्धा चाफेकर, हेमल इंगळे, आयुष्य भावे, आणि सना प्रभू या चौघींनीही मनोरंजन विश्वासोबतच सौंदर्य स्पर्धांमध्ये ही आपला ठसा उमटवला आहे. हेमल इंगळेही कोल्हापूरची अभिनेत्री आहे. तसेच कुणाल शुक्ल, करण परब यांनी यात प्रमुख भूमिका वटवल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केलेले आहे. खरी मैत्री म्हणजे आनंदाचा ठेवा. पण या जिगरी दोस्तीत कधीकधी अनबनही होतेच. रुपनगर के चिते या चित्रपटातून हाच विषय रंजकपणे मांडला आहे. मैत्री हा दोन अक्षरी शब्द… पण तो जपण्यासाठी माणसाला जाणीवपूर्व प्रयत्न करावे लागतात. हे दाखवणारा हा चित्रपट असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असे दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुप्रसिद्ध मल्याळम संगीतकार शान रहेमान आणि मनन शहा यांनी संगीताचे जबाबदारी पार पाडली आहे. तसेच महाराष्ट्रातील अतिशय अप्रतिम लोकेशन या चित्रपटांमध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!